महाराष्ट्र मुंबई

अजित पवारांनी दिला मुंबईच्या डबेवाल्यांना सुखद धक्का!

मुंबई | मुंबईच्या डबेवाल्यांना प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत लवकरात लवकर हक्काची घरं उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश उमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. काल मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती.

डबेवाल्यांचं कौशल्य जाणून घेण्यासाठी जगभरातील पर्यटक, अभ्यासक येत असतात. डबेवाल्यांना त्यांच्या कामकाजाची माहिती देण्यासाठी हक्काची जागा असावी. त्यासाठी मुंबई डबेवाला भवनाचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना अजित पवार यांनी दिल्या.

गेल्या 130 वर्षांपासून सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या डबेवाल्यांच्या घरांचा प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचं पवार यांनी सांगितलं.

दरम्यान, कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, अप्पर मुख्य सचिव संजय कुमार, महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव आणि मुंबई डबेवाला संघटनेचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

 

 

महत्वाच्या बातम्या-

-मुख्यमंत्र्यांचा ‘तो’ निर्णय चुकीचा; आघाडीत वादाच्या ठिणग्या

-कोल्हेंना चिमूरडीची भावनिक साद; आज बाहेर जाऊ नका. माझ्या घरी चला… ते तुम्हाला पकडतील…

-देशातील बेरोजगारी आणि महागाईला फक्त केंद्र सरकारच जबाबदार; सुप्रिया सुळेचं मोदी सरकारवर टीकास्त्र

-अखेर राज्यसरकारने भीमा कोरेगावचा तपास ‘एनआयए’कडे सोपवला

-“सुट्ट्यांच्या बाबतीत समान नागरी कायदा असावा असं कुणाला का वाटू नये”