इंदोरीकरांच्या समर्थनार्थ निघणार टाळ मृदुंगाच्या गजरात मोर्चा!

अकोला | प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी केलेल्या वक्तव्यावरुन राज्यभर वाद उफाळला आहे. इंदोरीकरांच्या समर्थनार्थ अकोला तालुका एकवटला आहे. त्यांच्या समर्थनार्थ रविवारी 23 फेब्रुवारी तालुका बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहेत.

तालुका बंदची हाक देऊन टाळ मृदुंगाच्या गजरात मोर्चा काढून प्रशासनाला निवेदन देण्यात येणार आहे. इंदोरकर समर्थकांची बुधवारी बैठक झाली. या बैठकीत तालुका बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं समजतंय.

महाराजांची नाहक बदनामी सुरु आहे. त्यांनी कीर्तनात पुत्रप्राप्तीबाबत केलेल्या वक्तव्याचा विपर्यास केला जात आहे. वक्तव्यामुळे झालेल्या वादानंतर त्यांनी दिलगीरी व्यक्त करुनही सूडभावनेने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे षडयंत्र आखलं आहे, अशा भावना बैठकीत अनेकांनी व्यक्त केल्या.

दरम्यान, रविवारी तालुका बंद ठेवून इंदोरीकरांच्या गावातून मोटारसायकल रॅलीने अकोल्यात येवून महात्मा फुले चौकातून टाळ मृदुंगाच्या गजरात बाजारतळापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे. शेवटी प्रशासनाला निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती आहे.

महत्वाच्या बातम्या-

-…तर आता कपडे काढून मला जावं लागेल- अजित पवारांची तुफान फटकेबाजी

-तृप्ती देसाईंनी केला इंदोरीकर महाराजांविरोधात गुन्हा दाखल

-शिवसेनेने घेतले दोन मंत्र्यांचे राजीनामे???

-देश तर सर्वांचा आहे, सर्वांसाठी आहे मग मशिदीच्या उभारणीसाठी ट्रस्टची स्थापना का नाही- शरद पवार

-रुपाली चाकणकरांनी स्त्रियांना दिला खास संदेश म्हणतात…