कोरोनावरील ‘ही’ औषधं मोफत देण्याचा सरकारचा विचार- उद्धव ठाकरे

मुंबई | मागील दोन दिवसांपासून राज्यात दिवसाला उच्चांकी रुग्णसंख्येची नोंद होत आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.

कोणत्याही औषधाच्या बाबतीत आपण पाठीमागे नाही आहोत. तुम्ही नाव सांगा ती औषध आपण वापरत आहोत. रेमडेसिवीर, फॅवीपिरावीर या औषधांसाठी मार्च, एप्रिलपासून आपण पाठपुरावा करत होतो. त्याची परवानगी मिळाली, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

रेमडेमीसीवर, फॅबीपीरावीर, टॅझीलोझुमा, एचसीक्यू, डॉक्सी ही करोनाची औषधं शासकीय आणि निमशासकीय रुग्णालयांमध्ये मोफत उपलब्ध करुन देण्याच्या विचारात प्रशासन आहे. पण, त्यासाठी केंद्राची परवानगी आणि औषधांची उपलब्धताही तितकीच महत्त्वाची आहे. रेमडेसीवीरसारखी औषधे राज्य सरकार उपलब्ध करुन देणार, तुटवडा भासू देणार नाही, असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

दरम्यान, ही औषधे शासकीय आणि निमशासकीय रुग्णालयात मोफत उपलब्ध करण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून केला जाईल, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

महत्वाच्या बातम्या-

-प्रसारभारतीकडून ‘पीटीआय’ वृत्तसंस्थेला इशारा; मुलाखत ठरली वादाचं कारण

-“कोरोनाचे मृत्यू लपवायचेच असते तर…..” राजेश टोपे यांनी केला खुलासा

-ज्यांनी माझ्या शेतकऱ्याला फसवलं त्यांना हे सरकार शिक्षा करणारच- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

-काँग्रेसच्या ‘या’ माजी पंतप्रधानांचं नरेंद्र मोदींनी केलं तोंडभरून कौतुक

-‘पडळकर…रात्रभर झोप येणार नाही अशा शिव्या देऊ’; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचा पडळकरांना दम