Top news

विरोधकांच्या टीकेनंतर कोरोनाच्या लढाईत पंतप्रधान मोदींचं महत्वाचं पाऊल!

नवी दिल्ली |  कोरोनाच्या लढाईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. पंतप्रधान मोदी सर्वपक्षीय नेत्यांबरोबर चर्चा करणार आहेत. येत्या बुधवारी म्हणजेच 8 एप्रिलला ते सर्वपक्षीय नेत्यांबरोबर व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेणार आहेत.

कोरोना महामारीच्या संकटानंतर दोन महिन्यांनंतर मोदींनी पहिल्यांदाच विरोधकांना विश्वासात घेतलं जात आहे. या बैठकीसंदर्भातील पत्र संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी शनिवारी राजकीय पक्षांच्या नेत्यांना पाठवले आहे.

पंतप्रधान मोदींनी देशवासीयांना 5 एप्रिलच्या रात्री 9 वाजता दिवे लावण्याचा उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. मात्र, पंतप्रधानांनी असले खुळचट प्रयोग थांबवून करोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक बिकट परिस्थितीबाबत लोकांशी संवाद साधला पाहिजे, अशी अपेक्षा विरोधी पक्षांनी केली होती. त्यानंतर आता मोदींनी महत्त्वाचं पाऊल उचललं आहे.

दरम्यान, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी तसंच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींना पत्र लिहिली होती. या पत्रात कोरोनाच्या कठीण काळात गरीबांना आर्थिक मदत देण्यासंबंधी तसंच कामगारांसाठी काही विशेष पावलं उचलण्याची विनंती दोघांनीही केली होती. आता सर्वपक्षीय बैठकीत आर्थिक मदतीवर किंवा निधीवर आक्रमक चर्चा होण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या –

-धक्कादायक, पुण्यात कोरोनाने घेतले आणखी दोघांचे बळी

-“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कौतुकास पात्र, माझा त्यांना सलाम”

-1023 तबलिगींना कोरोनाची लागण; देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 2902 वर

-‘धनंजय मुंडे कळवा, हजार रुपये मिळवा’; सुरेश धस यांची घोषणा

-कोरोनाविरुद्ध लढणाऱ्यांना ‘येवले अमृततुल्य’तर्फे तरतरी देण्याचं काम