Top news महाराष्ट्र मुंबई

‘RRR’ चिटपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; मोडले मागचे सगळे Records

RRR

मुंबई | एसएस राजामौली यांच्या ‘आरआरआर’ (RRR) चित्रपटाने खळबळ उडवून दिली आहे. त्याच्या मागील ‘बाहुबली’ चित्रपटाप्रमाणे या चित्रपटानेही बंपर कमाई सुरू केली आहे.

25 मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला नुकतेच 24 तास उलटले आहेत की त्याने बॉक्स ऑफिसवरील सर्व आकडे आणि व्यापार विश्लेषकांच्या विचार आणि अंदाजांना मागे टाकलं आहे.

या चित्रपटाने रिलीजच्या दिवशी 125 कोटींची कमाई केली आहे. आणि हे आश्चर्यापेक्षा कमी नाही. आगामी काळात या चित्रपटाची कमाई अनेक पटींनी वाढणार आहे. ज्याचा अंदाज सुरुवातीच्या टप्प्यातच आला आहे.

चित्रपटातील अॅक्शन सीन आणि चित्रपटाची कथा लोकांना आवडली आहे. त्यामुळे या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत इतर चित्रपटांना मागे टाकलं आहे.

बॉक्स ऑफिसवर या चित्रपटापूर्वी फक्त विवेक अग्निहोत्रीचा ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपट वाजत होता. पण आता 25 मार्च 2022 रोजी प्रदर्शित झालेल्या ‘RRR’ चित्रपटाने पूर्वीचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत एक वेगळाच स्तर प्रस्थापित केला आहे.

समीक्षकांनी चित्रपटाला 3.5 स्टार दिले, पण त्याची कमाई पाहता या चित्रपटासाठी 10 स्टारही कमी झाले असते असं वाटतं. कारण लोक या चित्रपटाचं खूप कौतुक करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

…तर मला विजय चौकात फाशी द्या- सुप्रिया सुळे 

पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य, म्हणाले… 

संधी सोडू नका! iPhone 13 वर मिळतोय आतापर्यंतचा सर्वात मोठा डिस्काउंट 

पोस्टाची भन्नाट योजना; तुमचे पैसे होतील दुप्पट

अनिल परबांचं रिसॉर्ट तोडण्यासाठी मोठा हातोडा घेऊन सोमय्या दापोलीकडे रवाना!