देश

देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन; सर्व रेल्वे गाड्याही 14 एप्रिलपर्यंत रद्द

नवी दिल्ली | देशात कोरोना विषाषूचा वाढता प्रादुर्भाव पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला 21 दिवसांसाठी लॉकडाऊन केलं जात असल्याचं घोषित केलं. या पार्श्वभूमीवर रेल्वेनेही सर्व प्रवासी आणि मालवाहतूक गाड्या 14 एप्रिलपर्यंत रद्द केल्या आहेत.

भारतीय रेल्वेच्या सर्व एक्स्प्रेस, पॅसेंजर, मेल आणि मालवाहतूक गाड्या रद्द राहणार आहेत. यापूर्वी रेल्वेने 31 मार्चपर्यंत सर्व प्रवासी गाड्या रद्द करण्याची घोषणा केली होती.

आता देशात दिवसांच्या लॉकडाऊन दरम्यान येत्या 14 एप्रिलपर्यंत सर्व प्रवासी आणि मालवाहतूक गाड्या रद्द केल्याची घोषणा भारतीय रेल्वेने केली आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी 22 मार्च रविवारी मध्यरात्रीपासून 31 मार्चपर्यंत मुंबई लोकलसेवेसह देशभरातील सर्व रेल्वे सेवा रद्द करण्यात आल्या. येत्या 31 मार्चपर्यंत लोकल तसेच भारतीय रेल्वेच्या सर्व गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या.

महत्वाच्या बातम्या – 

-मयताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार सुरूच; मास्कचा काळाबाजार करणाऱ्यांना पोलिसांनी पकडलं

-घरात बसून मी मिसेस मुख्यमंत्र्यांचं ऐकतो, तुम्ही तुमच्या गृहमंत्र्यांचं ऐका; उद्धव ठाकरेंचा मिश्किल अंदाज

-संकटाच्या परिस्थितीत मदत करण्यासाठी संघाचे स्वयंसेवक तयार- मोहन भागवत

-लॉकडाऊनच्या काळात कंडोमची मागणी वाढली; विक्रेतेही चक्रावले

-कोरोनाच्या भीषण संकटात सानिया मिर्झा गरिबांना करणार मदत