महाराष्ट्र मुंबई

“पेंग्विनच्या अंड्यातून बाहेर आलेला कोण आहे हा वरुण सरदेसाई?”

मुंबई | पेंग्विनच्या अंड्यातून आत्ता कुठे बाहेर आलेला कोण आहे हा वरुण सरदेसाई? हा कोण आम्हाला माफी मागायला सांगणार?, अशी जहरी टीका मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी केली आहे.

मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांना शिवसेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी पाठवलेल्या कायदेशीर नोटीसवर अमेय खोपकर यांनी सडकून टीका केली आहे.

महापालिकेचा ‘वरुण’ गोंधळ आतून तमाशा सुरु आहे. आम्ही मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्यांचा पर्दाफाश करणारच, असा घणाघात अमेय खोपकर यांनी केलाय.

संदीप देशपांडे यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर 24 तासात स्पष्टीकरण द्या, असं आव्हान देतो. स्पष्टीकरण द्यायची हिंमत आहे का?, असा सवाल अमेय खोपकर यांनी केला आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

-आरोग्य विभागामार्फत प्लाझ्मा संकलनासाठी…., राजेश टोपेंची घोषणा

-भिडे गुरूजी, लवकरच ठणठणीत बरा होऊन हा पैलवान आपले आशीर्वाद घेण्यास येईल- महेश लांडगे

-“परदेशी महिलेच्या पोटी जन्मलेली व्यक्ती देशभक्त असूच शकत नाही”

-काँग्रेसमध्ये ना सभ्यता आहे ना संस्कार आहेत- साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर

-इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस आक्रमक, राज्यभरात आंदोलन सुरु