पंढरपूरमध्ये महापूजेला मुख्यमंत्र्यांसह दत्ता भरणेंना प्रवेश द्या- अजित पवार

पुणे | विठूरायाची महापूजा करण्यासाठी मंत्र्यांना अनेक जणांचे फोन येत आहेत. मात्र अशा परिस्थितीत या शासकीय पूजेसाठी केवळ पालकमंत्री या नात्याने दत्ता भरणे हेच उपस्थित राहणार आहेत. या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला सक्त सूचना दिल्या आहेत.

मंदिर परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळे दत्ता भरणे वगळता इतर कोणालाच मंदिरात परवानगी देऊ नये, असं बजावण्यात आलं आहे. पालकमंत्री असल्याने त्यांना परवानगी द्यावी, अशी सूचना अजित पवार यांनी केली.

आषाढी एकादशीला पंढरपूरमध्ये विठूरायाची महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडणार आहे. मुख्यमंत्री, कुटुंबीय, मानाचा वारकरी आणि ठराविक पुजारी यांच्या उपस्थितीत शासकीय पूजा पार पाडणार आहे. तर ठाकरे सरकारमधील मंत्री दत्ता भरणे यावेळी उपस्थित असतील.

दरम्यान, राज्यभरातील आषाढी वारीसाठी 9 मानाच्या पालख्यांचे नियोजन झाले आहे. या पालख्या आज पंढरपूरमध्ये पोहोचतील. त्या पालख्या कशा न्यायच्या, याबाबत अद्याप चर्चा सुरु असल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-

-पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधणार, काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष

-भारताचा चीनला हिसका, टिकटॉकसह 59 अ‌ॅपवर बंदी

-जोतिबा फुले जनआरोग्य योजनेतून १ लाख २२ हजार कोरोनाबाधितांवर मोफत उपचार, आरोग्यमंत्र्यांचा दावा

-कोरोनाचा धोका टाळण्यासाठी….., मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची कडक सूचना

-जगातला सगळ्यात मोठा प्लाझ्मा ट्रायल प्रोजेक्ट, उद्धव ठाकरेंनी केली घोषणा