“मजुरांच्या गाड्यांना बंगालमध्ये प्रवेश न देणं हे माणुसकीला धरून नाही”

नवी दिल्ली | इतर राज्यात अडकलेल्या परप्रांतीयांना आपापल्या राज्यात परत आणण्यासाठी विविध राज्य सरकारे हरतऱ्हेचे प्रयत्न करीत आहेत. मात्र पश्चिम बंगालकडून यासाठीचे कोणतेही प्रयत्न होत नसल्याचा आरोप केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शहा यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पत्र लिहिलं आहे.

अमित शहा यांनी सध्याच्या परिस्थितीत केंद्र सरकारला सहकार्य करण्याची अपेक्षा ममतांकडून व्यक्त केली आहे. तसंच स्थलांतरीत मुजरांना आपल्या घरी पोहचण्यासाठी राज्य सरकारकडून सहकार्य प्राप्त होत नसल्याची तक्रार देखील त्यांनी पत्रातून केली आहे.

मजुरांच्या गाड्यांना बंगालमध्ये प्रवेश न देणं हे माणुसकीला धरून नाही. तसंच हा त्यांच्यालरचा अन्याय आहे, असं सांगत तुम्ही त्यांना प्रवेश द्या नाहीतर त्यांचे खूप  हाल होतील. आपण माणुसकीच्या नात्यातून त्यांच्याकडे पाहिलं पाहिजे, असं अमित शहा यांनी पत्रात म्हटलं आहे.

दरम्यान, सध्या कोरोनाने फाळणीनंतरचं सगळ्यात मोठं स्थलांतर सुरू झालेलं दिसून येत आहे. विविध राज्यांतून परप्रांतीय मजूर आपापल्या राज्यांमध्ये परत जात आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-आज फिर हमने दिल को समझाया; दुखा:त बुडालेल्या मेधा कुलकर्णींचं ट्विट

-‘अरे वाघांनो असं रडताय काय मी आहे ना…’ दुखावलेल्या कार्यकर्त्यांची पंकजांनी घातली समजूत

-देशातल्या मुस्लिमांना दुय्यम नागरिक ठरवता येणार नाही- संजय राऊत

-देशातल्या मुस्लिमांना दुय्यम नागरिक ठरवता येणार नाही- संजय राऊत

-CBSE बोर्डाच्या 10 वी 12 वीच्या परीक्षा 1 ते 15 जुलै दरम्यान होणार- रमेश पोखरियाल