Top news महाराष्ट्र मुंबई

‘राज’पुत्राचा मुख्यमंत्र्यांना फोन; उद्धव यांचा देखील सकारात्मक प्रतिसाद

मुंबई |  लॉकडाऊनमुळे सध्या अनेक नागरिक राज्याच्या विविध शहरात अडकले आहेत. पुण्यात एमपीएससी परीक्षेचा अभ्यास करणायासाठी हजारो मुलं वास्तव्यास आहेत. ही मुलं लॉकडाऊनमुळे पुणे शहरातच अडकली आहेत. या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी राज ठाकरे यांचे पुत्र आणि मनसे नेते अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून संवाद साधला.

अमित ठाकरे यांना पुण्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी काल रात्री 10 वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून पुण्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांना मदत करण्याची विनंती केली.

महाराष्ट्र सरकारने येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये त्यांच्या घरी जाण्याची व्यवस्था करावी, अशी विनंती अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना केली. मुख्यमंत्र्यांनी देखील त्यांना सकारात्मक प्रसिसाद दिला.

दुसरीकडे मुंबई पुण्यासह राज्यातील सर्व जिल्ह्यात अडकलेले विद्यार्थी, मजूर, नातेवाईकांकडे गेलेल्या व्यक्ती अशा सर्वांना पुढील चार पाच दिवसात आपापल्या जिल्ह्यात सोडण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. शासनाकडून एसटी बसेसमार्फत मोफत सेवा दिली जाणार आहे, असं मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, अमित राजसाहेब यांनी पुण्यामध्ये एमपीएससी व इतर स्पर्धा परिक्षांमुळे अडकलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी जाण्याची तात्काळ सोय करण्यात यावी यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांशी चर्चा केली, असं एमपीएससी समन्वय समितीने सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-बुद्ध हे केवळ नाव नसून मानवतेचा विचार आहे- पंतप्रधान नरेंद्र मोदी

-कालच्या प्रकारावर देवेंद्र फडणवीसांनी संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागावी, छत्रपती संभाजीराजेंची मागणी

-मुख्यमंत्र्यांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक; फडणवीस राज ठाकरेंसह प्रमुख नेत्यांना केलं निमंत्रित

-फडणवीसांच्या शाहू महाराजांवरील त्या वादग्रस्त ट्विटवर; छत्रपती संभाजीराजेंची प्रतिक्रिया

-…तर तुम्ही दारूच्या बाटल्या घरपोच पुरवण्याची सेवा सुरू करावी; राऊतांचा ‘राज’समर्थकांवर निशाणा