छत्रपती शिवाजी महाराज हे शब्द नाहीत तर मंत्र; अमिताभ बच्चन यांनी दिली शिवरायांना मानवंदना

मुंबई | छत्रपती शिवाजी महाराज हे शब्द नाहीत तर हा एक मंत्र आहे. आजही त्यांच्याकडून प्रेरणा मिळते. छत्रपती शिवाजी महाराज यांना शत् शत् नमन। अशा आशयाचं ट्विट करुन अमिताभ बच्चन यांनी महाराजांच्या जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी रयतेच्या सुखासाठी जिवाचं रानं केलं. आपल्या निवडक मावळ्यांना सोबत घेऊन त्यांनी शत्रूशी दोन हात केले. एका आदर्श स्वराज्याची स्थापना केली, असं अमिताभ बच्चन म्हणाले आहेत.

महाराष्ट्राचा हा ‘जाणता राजा’ पिढ्यानपिढ्या आपल्या देशातील प्रत्येकासाठी एक प्रेरणास्त्रोत राहिला आहे, अशा शिवाजी महाराजांना बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी जयंतीनिमित्त मानाचा मुजरा केला आहे.

दरम्यान, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची 390 वी जयंती आज मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. शिवरायांची जन्मभूमी शिवनेरी गडासह राज्यभरात ठिकठिकाणी शिवजन्मोत्सव सोहळा पार पडत आहे.

महत्वाच्या बातम्या-

-नागराज मंजुळे-रितेश देशमुख घेऊन येणार शिवाजी महाराजांची ‘महागाथा’; टीझरद्वारे घोषणा

-शिवजयंतींच्या शुभमहुर्तावर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी केले शिवनेरी किल्ल्यासाठी 23 कोटी मंजूर

-विखे पाटलांच्या फ्लेक्सवरून भाजप गायब, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!

-64MP कॅमेरा असलेला शाओमीचा हा लोकप्रिय फोन झाला आणखी स्वस्त!

-माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर त्याला इंदुरीकरच जबाबदार असतील- तृप्ती देसाई