तरुणीच्या गुप्तांगातील स्वॅब नमुने प्रकरणावर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा संतापल्या; म्हणाल्या…

अमरावती | अमरावतीमध्ये खूप संतापजनक अशी घटना घडली आहे.  संक्रमित रुग्णाच्या संपर्कातील 24 वर्षीय तरुणीच्या गुप्तांगातून स्वॅब घेतल्याचा धक्कादायक प्रकार अमरावती मधील बडनेरा येथे घडला आहे.  हा प्रका खूपच भयानक आहे. यामुळे राजकीय वातावरणही तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा संताप व्यक्त केला आहे.

महिला याआधीच सक्षम झाल्यामुळे मी खासदार झाले. तर प्रतिभाताई पाटील देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती झाल्या. याच जिल्हात महिला खासदार, महिला पालकमंत्री आहेत. तरीही याच जिल्हात असे धक्कादायक प्रकार होत आहेत, असं म्हणत नवनीत राणा यांनी पीडित मुलीला न्याय मिळावा यासाठी रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा दिला आहे.

अमरावती येथील आरोग्य यंत्रणा पार ढासळली आहे. कोव्हिड रुग्णांचे हाल होत आहेत. कोव्हिड तपासणी करणाऱ्या खाजगी, कंत्राटी व्यक्तींची पार्श्वभूमी तपासून पाहली पाहिजे असल्याचं राणा यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, 24 वर्षीय तरुणीने याप्रकरणी अल्पेश अशोक देशमुख (वय 30) याच्याविरोधात फिर्याद नोंदवली आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी अल्पेश देशमुख विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून मंगळवारी रात्री उशिरा त्याला ताब्यात घेण्यात आलं असल्याची माहिती आहे.

महत्वाच्या बातम्या-

पत्नीला रोगानं ग्रासलं, नातेवाईकांनी त्याला नाकारलं; तो मात्र एकटाच जळत राहिला!

आईसोबत खेळत असताना बाल्कनीतून तोल जाऊन 2 वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्य

‘होय मी अनेकांचे खून केले, कित्येकांच्या किडण्याही काढल्या’; डॉक्टरचा धक्कादायक जबाब

धक्कादायक! ‘या’ माजी आमदाराने केला 12 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार

माझं वाक्य उलटं वाचलं गेलं, मी म्हटलं होतं की…- चंद्रकांत पाटील