नागपूर महाराष्ट्र

उद्धवजी, आपल्यातील भांडणं विसरुन कठोर निर्णय घ्या- अमृता फडणवीस

नागपूर | हिंगणघाट आणि औरंगाबाद येथील घटनेवर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच आपल्यातलं भांडण विसरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याप्रकरणी कठोर निर्णय घ्यावेत, असं आवाहन त्यांनी केलं आहे.

हिंगणघाट आणि औरंगाबाद येथे महिलांना जाळून मारण्याचा प्रयत्न झाला होता. या घटनेमुळे महाराष्ट्रभर संतापाची लाट आहे. यावर अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली असून महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर निर्णय घेण्याची गरज असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. त्यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे.

महाराष्ट्रात गेल्या 2 महिन्यात 4 acid attack च्या दुर्देवी घटना घडलेल्या आहेत! हिंगणघाट येथे पेट्रोल टाकून प्रोफेसरला जाळण्याचा प्रयत्न, औरंगाबादमधील बलात्काराचे प्रकरण-ऐकून त्रास होतो! आपल्यातील भांडणे विसरुन-सुरक्षिततेविषयी कठोर निर्णय घेणे आवश्यक आहेत, असं त्या म्हणाल्या आहेत.

देवेंद्र फडणवीस सरकारच्या ‘मनोधैर्य’ ह्या ‘acid attack victors’ साठी असलेल्या योजनेतील सवलती पीडितेला देण्यात याव्या अणि महिला आयोग अध्यक्षाचे पद लवकर भरण्यात यावे- माननीय हिंदू हृदयसम्राट बाळासाहेबांचे खरे स्वप्नं आता जमिनीवर येऊन पूर्ण करा, असंही अमृता म्हणाल्या आहेत.

 

 

महत्वाच्या बातम्या-

-पीडितेला भेटायला जाताना यशोमती ठाकूरांसोबत कार्यकर्त्यांची गर्दी

-महराष्ट्रात पवारांचे राज्य पुन्हा सुरु झाले- माधव भंडारी

-प्रदूषणासाठी मुख्यमंत्री डोंबिवलीत येताहेत हे दुर्दैव- राजू पाटील

-महिला अत्याचाराची गृहमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल; राबवणार ‘आंध्र पॅटर्न’!!

-आंध्र प्रदेशच्या धर्तीवर राज्यातही ‘दिशा’ कायदा आणणार; अनिल देशमुखांची घोषणा