Loading...
महाराष्ट्र मुंबई

हिंगणघाट पीडितेचा संपूर्ण खर्च मी उचलतो; उद्योगपती आनंद महिंद्रा यांचं ट्वीट

मुंबई | महाविद्यालयात शिक्षिका असलेल्या तरुणीला भर चौकात पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कदायक घटना हिंगणघाट येथे घडली. ही तरुणी सकाळी महाविद्यालयात जाण्यासाठी निघाली असताना आरोपीने हे कृत्य केले. या घटनेने महाराष्ट्र सुन्न आहे तर पीडित तरूणी मृत्यूशी झुंज देतीये. या पीडितेचा संपूर्ण खर्च उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी उचलण्याची तयारी दर्शवली आहे.

विचारांपलिकडची क्रुरता…. आयुष्य उध्वस्त करणारी घटना…आणि त्याहून क्रुर म्हणजे जेव्हा आपण ही बातमी वाचून वृत्तपत्राचं पान उलटतो… कशी आहे ती… तिच्या उपचाराचा खर्च ती कसा उचलतीये…  जर कुणी पीडितेला किंवा तिच्या कुटुंबाला ओळखत असेल तर मला नक्की कळवा. मी सर्वोतपरी मदत करण्याचा प्रयत्न करीन. मला वृत्तपत्राचं पान उलटून गप्प राहायचं नाही, असं ट्वीट आनंद महिंद्रा यांनी केलं आहे.

Loading...

दुसरीकडे राज्य सरकारने देखील पीडितेच्या उपचाराचा खर्च उचलण्याची तयारी दर्शवली आहे. पीडितेवर उपचारासाठी मुंबईहून खास डॉक्टरांची टीम नागपूरला गेली आहे.

दरम्यान, पीडितेच्या उपचाराचा खर्च उचलण्यासाठी अनेक सेवाभावी संस्था आणि तसंच वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांनी पुढं येणं गरजेचं आहे.

 

 

महत्त्वाच्या बातम्या-

-आम्ही ऑपरेशन करणार नाही, तर लवकरच सरकारचं सीजर होईल; बबनराव लोणीकरांचं टीकास्त्र

-देशात बेरोजगारी एवढी वाढलीय की देशातील तरुण पंतप्रधान नरेंद्र मोदींना लाठ्यांनी मारतील- राहुल गांधी

Loading...

-शिवसेनेने माझ्या आमदारकीचा राजीनामा घेतला, तर मी शिपाई म्हणून काम करेन- तानाजी सावंत

-शिवसेनेने माझ्या आमदारकीचा राजीनामा घेतला, तर मी शिपाई म्हणून काम करेन- तानाजी सावंत

-शाहीन बाग आंदोलनादरम्यान फुलल्या प्रेमाच्या कळ्या; दोन जोड्या करतायत लग्न

Loading...