ती आपल्याला कायमचं सोडून गेली…; आनंद महिंद्रा यांचं ते ट्वीट व्हायरल

मुंबई | महाविद्यालयात शिक्षिका असलेल्या तरुणीला आठवड्याभरापूर्वी भर चौकात पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना हिंगणघाट येथे घडली. ही तरुणी सकाळी महाविद्यालयात जाण्यासाठी निघाली असताना आरोपीने हे कृत्य केले. या घटनेने महाराष्ट्र सुन्न झाला होता. पीडितेच्या कुटुंबाला मदतीच्या हातांची गरज होती. शासनाने तर तयारी दर्शवली होती त्याच दरम्यान प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी हिंगणघाट पीडितेचा संपूर्ण खर्च  उचलण्याची तयारी दर्शवली. त्यांच्या संवेदनशील आणि हळव्या मनाचं अनेकांनी कौतुक केलं आणि त्यांना सॅल्यूट ठोकला. मात्र आठवडाभर पीडित तरूणीने मृत्यूशी दिलेली झुंड अपयशी ठरली आहे. हिंगणघाटची निर्भया आपल्याला सर्वांना सोडून निघून गेलीये. त्याच पार्श्वभूमीवर महिंद्रा यांचं ते ट्वीट व्हायरल होतंय.

आनंद महिंद्रा ट्वीट करून काय म्हणाले होते??-

विचारांपलिकडची क्रुरता…. आयुष्य उध्वस्त करणारी घटना…आणि त्याहून क्रुर म्हणजे जेव्हा आपण ही बातमी वाचून वृत्तपत्राचं पान उलटतो… कशी आहे ती… तिच्या उपचाराचा खर्च ती कसा उचलतीये…  जर कुणी पीडितेला किंवा तिच्या कुटुंबाला ओळखत असेल तर मला नक्की कळवा. मी सर्वोतपरी मदत करण्याचा प्रयत्न करीन. मला वृत्तपत्राचं पान उलटून गप्प राहायचं नाही…ऍ

हिंगणघाट जळीतकांडातील पीडित तरुणीची सात दिवसांपासून सुरु असलेली मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आहे. तिने आज सकाळी 6.55 वाजता अखेरचा श्वास घेतला. या घटनेवर महाराष्ट्रभरातून उद्विग्न प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

दुसरीकडे हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेच्या मृत्यूची बातमी अत्यंत वेदनादायी आहे. घटनेचं वर्णन करणं अशक्य आहे. साहजिकच राज्यातील लोकांच्या मनात मोठा रोष आहे. त्या नराधमाला शिक्षा दिल्याशिवाय सरकार स्वस्थ बसणार नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

दरम्यान, सर्वपक्षीय महिला नेत्यांची आरोपीला लवकरात लवकर शिक्षा व्हावी, अशी मागणी एकमुखाने पुढे येत आहे. तर राष्ट्रवादीच्या युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांनी हैदराबाद प्रकरणामध्ये जसा आरोपीचा एन्काउंटर केला होता तसा हिंगणघाटच्या नराधमाचा एन्काउंटर झाला पाहिजे, तेव्हाच पीडितेच्या आत्म्याला शांती मिळेल; अशी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या-

-आपल्या घरात ‘असा’ नराधम निर्माण होऊ देऊ नये हीच खरी श्रद्धांजली- अजित पवार

-प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा अन् आरोपीला 1 महिन्यात फाशी द्या- नवनीत राणा

-बारामतीत होणार रणजी सामना; पवारांनी करून दाखवलंच!

-या राक्षसाचा सुद्धा एन्काउंटर करा…. त्याचवेळी पीडितेला न्याय भेटेल- सक्षणा सलगर

-नराधमाला शिक्षा दिल्याशिवाय सरकार स्वस्थ बसणार नाही- उद्धव ठाकरे