“आम्हाला ‘अशीच’ सुनबाई हवी”, भाजप खासदाराच्या आदित्य ठाकरेंसाठी खास शुभेच्छा

मुंबई | शिवसेना नेते व राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज अयोध्या दौऱ्यावर होते. यावेळी अयोध्येत महाराष्ट्र सदन बांधण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती आदित्य ठाकरेंनी दिली.

आदित्य ठाकरे यांनी आज अयोध्येत रामलल्लांचं दर्शन घेतलं. त्यापूर्वी आदित्य ठाकरेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला व आम्ही राजकारणासाठी नाही तर तीर्थयात्रेसाठी आलो असल्याचं  स्पष्ट केलं.

आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावरून भाजपचे नवनिर्वाचित खासदार अनिल बोंडे यांनी ठाकरे कुटुंबाला खास शुभेच्छा दिल्या आहेत. आदित्य ठाकरेंचं लवकर शुभमंगल होवो, असं अनिल बोंडे म्हणाले.

प्रभू श्रीरामाचे ते दर्शन घेत आहेत हे अतिशय चांगलं असल्याचं बोंडे म्हणाले. तर मी सिद्धिविनायकाला जाऊन आलो त्यावेळी प्रार्थना केली केली आदित्य ठाकरेंचं लवकर शुभमंगल होवो ,असं अनिल बोंडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं.

आदित्य ठाकरे माझ्या मुलाच्या वयाचे आहेत. विदर्भातील सून असेल तर फारच चांगलं होईल, असंही अनिल बोंडे म्हणाले. तर सीतामाईंसारखीच सुनबाई आम्हाला मिळो, अशी अपेक्षाही बोंडे यांनी बोलून दाखवली.

आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याची अनेक दिवसांपासून चर्चा रंगली होती. आदित्य ठाकरे यांनी या दौऱ्याचा राजकारणाशी काहीही संबंध नसल्याचं देखील सांगितलं आहे.

दरम्यान, दोन वर्षांनंतर अयोध्या दौऱ्यावर आल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले. तर आजही तोच उत्साह असल्याचं आदित्य ठाकरेंनी बोलून दाखवलं.

महत्त्वाच्या बातम्या-

आषाढी एकादशीनिमित्त अनिल परब यांची मोठी घोषणा, म्हणाले…

“शतरंज का बादशाह म्हणजे देवेंद्र फडणवीस”

‘हे योग्य नाही’; दीपाली सय्यद यांनी पुन्हा मनसेला डिवचलं

‘राज्यातील कोरोना रूग्णसंख्येत वाढ पण…’; राजेश टोपेंनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केवळ कार चालवतात, हे सरकार तर भगवान चालवतो”