Loading...
Top news महाराष्ट्र मुंबई

पोलिसांनी तेल लावून लाठी वापरावी- अनिल देशमुख

मुंबई |  जनता कर्फ्यू पासून विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या लोकांना पोलिस लाठीने चोप देत आहेत. प्रशासनाकडून वारंवार सूचना देऊनही काही लोकं घराबाहेर पडत आहे. त्यामुळे अशा लोकांसाठी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिसांना खास आदेश दिले आहेत.

राज्याचे मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, देशाचे पंतप्रधान वारंवार घराबाहेर पडू नका असा सल्ला देत आहेत. तरीही समाजातील काही 5 ते 10 टक्के लोकं घराबाहेर पडत आहेत. अशा लोकांसाठी पोलिसांनी हातात लाठी घेऊन तयार रहावं. लाठीला तेल लावून अशा लोकांवर कारवाई केल्याशिवाय आता पर्यायच उरलेला नाही, असं अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे.

Loading...

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सध्या देशभरात तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. देशातील महत्वाच्या शहरांमध्ये अजुनही करोनाचे नवीन रुग्ण सापडत आहेत.

दरम्यान, परिस्थितीचा अंदाज घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रात्री आठ वाजता जनतेशी संवाद साधत पुढील 21 दिवस संपूर्ण देशात लॉक डाऊन करणार असल्याचं सांगितलं.

महत्वाच्या बातम्या – 

-…तर दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश देऊ!

-कोरोनाच्या संकटाची तीव्रता कमी होवो; राज ठाकरेंनी दिल्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा

-“योगी आदित्यनाथ नरेंद्र मोदींचं ऐकत नाही मग जनता त्यांचं का ऐकेल?”

-होळीला अ‌ॅडमिट, गुढीपाडव्याला डिस्चार्ज; पुण्यातील दाम्पत्याची ‘कोरोना’वर मात

-‘कोरोनाला हरवण्याच्या संकल्पाची गुढी उभारा’; अजित पवारांचा साधेपणाने गुढीपाडवा

Loading...