“म्हणजे उद्या आम्ही खासगीत आमच्या बायकांशीही बोलायचं नाही”

मुंबई | विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत एका स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून सनसनाटी आरोप केले आहेत.

सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्यामार्फत अनेक महानायक खेळ खेळत असल्याचा अतिशय गंभीर, स्फोटक आरोप पुराव्यांसह फडणवीसांनी केला केला. पेन ड्राईव्ह सादर करत त्यांनी हे आरोप केले आहे.

फडणवीसांनी केलेल्या आरोपांवर  माजी आमदार अनिल गोटे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आपल्यावर करण्यात आलेले सगळे आरोप अनिल गोटे यांनी फेटाळून लावले आहेत. फोन टॅपिंगवरुन त्यांनी व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला घातला जात असल्याचं म्हटलंय.

म्हजे उद्या आम्ही खासगीत आमच्या बायकांशीही बोलायचं नाही का’ असा सवालही उपस्थित केला आहे. फोन टॅपिंग करायचे काही नियम आहेत की नाही? फोन टॅपिंग मॅन्युप्युलेट केलेलं आहे, असा आरोप अनिल गोटे यांनी केला आहे.

माझं नाव घेतलं याबाबत मी त्यांचा आभारी आहे, याशिवाय मला त्यांच्याबद्दल बोलताच आलं नसतं. आम्ही कुणाला अडकवण्यासाठी तिथे बसलो होतो असं त्यांनी म्हटलंय.

माझ्या एका केसबाबत मी तिथं बसलो होतो. चव्हाण नावाचे वकील जे आहेत, ते आमच्या धुळ्याला सातत्यानं येत होते. त्यामुळे त्यांना भेट घ्यायला गेलो होतो. पण देवेंद्र फडणवीस यांना एवढी काय पडली आहे की तिथे जाऊन शूटिंग करायला लावलं? म्हणजे कुणी आपआपसामध्ये बोलूही नये. केंद्र सत्तेचा दुरुपयोग करते, ते यातूनच सिद्ध होतं, असंही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या – 

धक्कादायक! ‘या’ ठिकाणी सापडला Omicron चा नवा व्हेरिएंट 

“अजित पवार ऐकत नाहीत पण बडे साहब सब देख रहे है”; फडणवीसांकडून आरोपांची सरबत्ती

“…तर आम्हीही अनिल परबांना बांबू लावण्यास मागे पुढे पाहणार नाही”

“ईडी आणि ईडीचे अधिकारी भाजपची ATM मशीन”, राऊतांचा हल्लाबोल

“अजित पवार तुमच्या शब्दाला काडीची किंमत नाही, मोठेपणा दाखवायचा बंद करा”