देवेंद्र फडणवीसांना टरबुज्या भाजपमधलेच काही लोक म्हणायचे- अनिल गोटे

जळगाव |    देवेंद्र फडणवीसांना भाजपमधील विरोधी गटात असलेले अनेक नेते ‘टरबुज्या’ म्हणायचे… आता तर तेच नामकरण सर्वश्रुत झाले, त्याला विरोधी पक्ष तरी काय करणार? असं राष्ट्रवादीचे नेते अनिल गोटे यांनी म्हटलंय. अनिल गोटे यांनी एक पत्रक काढलं आहे. यामध्ये त्यांनी विविध विषयांवर आपली मतं व्यक्त केली आहे.

भाजपमधील नेत्यांचे बारसे अन्य कुणी करायला पक्षातील नेत्यांनी संधीच शिल्लक ठेवली नाही. आपापसातील व्देष आणि स्पर्धा इतकी टोकाला गेली होती की, त्यांनीच एकमेकांचे नामकरण करुन गुपचूप बारसे साजरे केले, असा टोलाही त्यांनी पत्रकातून लगावला आहे.

भाजपमध्ये स्वत:चं नाव आणि आडनाव एकत्र करुन उल्लेख करण्याची पध्दत आहेच. पंतप्रधान नरेंद्र मोदींना ‘नमो’ म्हणतात तसंच गृहमंत्री अमित शाहांना ‘मोटाभाई’ म्हणतात, असंही ते म्हणाले.

देवेंद्र फडणवीसांना मी महारोग म्हणालो नाही. संतापाच्या भरात वगैरे काही बोललो नाही. उलटपक्षी माझ्या मनात उसळलेल्या संतापाच्या ज्वालामुखीची आग बाहेर पडू नये म्हणून संयमी वक्तव्य केले, असंही गोटे म्हणाले.

पत्रकात प्रसिध्दी माध्यमांशी जे बोललो तेच माझ्या पत्रकात आहे. शांत डोक्याने संतापावर नियंत्रण ठेवून लिहले आहे. फडणवीसांना महारोगाची उपमा दिली. ‘महारोगी’ असे म्हणालो नाही. याचे भान भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी ठेवावे, असं पत्रक अनिल गोटे यांनी लिहिलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-पुणे विभागात सलून सुरु करण्यास परवानगी; ‘या’ नियमांचं पालन करणं बंधनकारक

-सुशांतच्या आत्महत्येनंतर झालेल्या ट्रोलिंगनंतर आता करण जोहरने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

-‘ही राजकारणाची वेळ नाही’; शरद पवारांचा काँग्रेसला टोला

-राष्ट्रवादीच्या ‘या’ नगरसेवकाने गोपीचंद पडळकरांना बाईकवरुन शहरभर फिरवलं

-सुशांतच्या आत्महत्येनंतर कुटुंबियांचा चाहत्यांसाठी मोठा निर्णय