Top news क्राईम

संतापजनक ! रात्रीचा डाव साधत 83 वर्षीय वृद्ध महिलेवर युवकांनी केला बलात्कार

राजपूर | झारखंडमधील चतरा जिल्ह्यातील केंदुवा साहोर या गावात माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. गावातीलच दोन युवकांनी 83 वर्षीय वृद्ध महिलेवर सामूहिक बलात्कार केला आहे. या घटनेमुळे परिसरातील सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला असून आरोपींला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

गुरुवारी रात्री 83 वर्षीय वृद्ध महिला आपल्या घरात एकटीच झोपली होती. त्यावेळी अचानक राजेश कुमार सिंह (वय 22) आणि रतन सिंह (वय 19) हे दोघेजण दारूच्या नशेत वृद्ध महिलेच्या घरात शिरले. वृद्ध महिलेवर जबरदस्ती करत त्या दोघांनी तिच्यावर बलात्कार केला.

दुसऱ्या दिवशी गावामध्ये ही बातमी पसरल्यानंतर गावातील काही लोकांनी हा सर्व प्रकार दाबण्याचा प्रयत्न केला. तर, काही लोकांनी महिलेला पोलीस स्टेशनमध्ये न जाण्याचा सल्लाही दिला. मात्र, वृद्ध महिला काटीच्या आधार घेत पोलीस स्टेशनमध्ये पोहचली व तिने पोलिसांना घडलेला सर्व प्रकार सांगितला.

दरम्यान, घडलेला सर्व प्रकार ऐकून पोलिसांनाही आश्चर्याचा धक्का बसला. मात्र, महिलेची वैद्यकीय चाचणी केल्यानंतर सत्य सर्वांच्या समोर आलं. पोलिसांनी संबंधित युवकांना ताब्यात घेतल असून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

संतापजनक! देशाच्या सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्या सीआरपीएफच्या जवानानंच महिलेबरोबर केलं ‘हे’ धक्कादायक कृत्य

सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात उद्धव ठाकरे काँग्रेस आणि बॉलिवूड माफियांच्या दबावाखाली- उपमुख्यमंत्री

राज्याच्या आरोग्यमंत्र्यांवर दु: खाचा डोंगर; राजेश टोपेंच्या मातोश्रींचं निधन

“आम्ही येतोय रे ठाण्याला कोण अडवतंय बघूया, हे सरकार शिवशाहीचं नाही तर मोघलाईचं आहे”

दडी मारलेला पाऊस करणार दैना; पुढील 4 दिवस ‘या’ भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता