महाराष्ट्र रत्नागिरी-सिंधुदुर्ग

संतापजनक! पुन्हा एकदा महिला आरोग्य कर्मचाऱ्यासोबत घडला संतापजनक प्रकार

रत्नागिरी | देशात कोरोनाचं संकट वाढत असतानाच कोव्हीड योद्धे आपल्या जिवाची बाजी लावून काम करत आहेत. मात्र, देशाच्या विविध भागातून याच योद्ध्यांवर हल्ले झाल्याच्या घटना समोर येत आहेत. कोरोना सर्व्हेचं काम करणाऱ्या महिला आरोग्य कर्मचाऱ्यासोबत रत्नागिरी जिल्ह्यात संतापजनक प्रकार घडला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील अडखल जुईकर मोहल्ला येथे एक महिला आरोग्य कर्मचारी कोरोना सर्व्हे करण्यसाठी गेली होती. मात्र गावातील 50 ते 60 लोकांनी त्या महिला कर्मचाऱ्याला घेराव घातला आणि हे काम थांबवा असं म्हणत तिच्यावर दबाव टाकला.

गावकऱ्यांनी या आरोग्य सेविकेच्या गाडीची चावी काढून घेत तिला धमकावण्याचा प्रयत्न केला. गावातील पुरुषांनी दमदाटी करत तिला गावातून हाकलून दिले. रत्नागिरी पोलिसांनी याप्रकरणी गावकाऱ्यांविरोधी गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यातीलच साखरीनाटे या गावात आरोग्य विभागाचे कर्मचारी आणि पोलिसांवर जमावाने हल्ला केला होता. ही घटना ताजी असतानाच पुन्हा आरोग्य सेविकेला धमकवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. जिल्ह्यात कोव्हीड योद्ध्यांवर होणारे हल्ले हे चिंतेचा विषय ठरत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

कौतूकास्पद! रक्ताच्या नात्यांनी अंत्यसंस्कारासाठी नाकारलं पण माणुसकीच्या नात्याने निभावलं; सरपंचाने घातला अनोखा आदर्श

औरंगाबादमध्ये हृदयद्रावक घटना! तीन सख्ख्या भावांसह पाच जणांचा पाण्यात बुडून मृत्यू

धक्कादायक! कुटुंबावर उपासमारीची वेळ आल्याने एसटी कर्मचाऱ्याने उचललं ‘हे’ मोठं पाऊल!

ठाकरे सरकारचं स्टिअरिंग नेमकं कोणाच्या हातात?; उद्धव ठाकरे म्हणाले

स्टिअरिंगवरील हात निसटला तर गाडी झाडावर आदळणार- रावसाहेब दानवेंचा टोला