“आपण कुठल्याही पक्षाचे असा…आता आपण सारे जण दिल्लीचे 2 कोटी लोक माझे कुटुंबीय आहात”

नवी दिल्ली |  दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची अरविंद केजरीवाल यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतली आहे. यावेळी अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीकरांना उद्देशून अतिशय भावुक असं भाषणं केलं. आपण कुठल्याही पक्षाचे असा…आजपासून मी प्रत्येक दिल्लीकरांचा मुख्यमंत्री आहे, असं ते म्हणाले आहेत.

आपण कुणालाही मतदान दिलं असेल… आता आपण सारे जण दिल्लीचे 2 कोटी लोक माझे कुटुंबीय आहात. आपण कुठल्याही पक्षाचे असा… आपण माझ्या कुटुंबाचा हिस्सा आहात…. तुमचं काहीही काम असेल तर डायरेक्ट माझ्याकडे या… तुमचं काम करेन, असं ते म्हणाले आहेत.

आताच निवडणुका झाल्या आहेत. काहींनी ‘आप’ला मतदान दिलं. काहींनी भाजपला मतदान दिलं. काहींनी काँग्रेसला मतदान केलं. पण आज मी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलीये. तर मी आजपासून प्रत्येक दिल्लीकरांचा मुख्यमंत्री आहे, असं ते म्हणाले आहेत.

दरम्यान, अरविंद केजरीवाल यांच्यासह आपच्या 6 नेत्यांनी देखील थपथ घेतली. यामध्ये मनीष सिसोदीया, सतेंद्र जैन, गोपाल राय, कैलाश गेहलोत, इम्रान हुसेन आणि राजेंद्र गौतम या नेत्यांचा समावेश आहे.

महत्वाच्या बातम्या-

-कै.आर.आर.(आबा) पाटलांच्या नावाने सरकार देणार ‘हा’ पुरस्कार!

-“उद्धव ठाकरेंनी स्वत:च्या मुलाला मुख्यमंत्री बनवण्याच्या महत्वाकांक्षेसाठी या जनादेशाचा अनादर केला”

-चांगलं काम करुनही एवढा त्रास सहन करावा लागतोय; इंदुरीकरांची पुन्हा उद्वीग्न प्रतिक्रिया

-…म्हणून आज तुम्हाला घरी बसावं लागलं- अजित पवार

-लोकांना मोफत योजना घेण्याची सवय लावू नका- अजित पवार