नाशिक महाराष्ट्र

“जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मोदी…. अन् मोदी आहेत तोपर्यंत मी!”

नाशिक | जोपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, तोपर्यंत मला मंत्रिपद आहे. जोपर्यंत मी आहे, तोपर्यंत मोदी आहेत. ये मोदी और मेरे अंदर की बात है, असं मिश्कील वक्तव्य रिपाइं प्रमुख आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे.

काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह अभिवादन सभेत आठवले बोलत होते. यावेळी त्यांनी वरील गमतीशीर वक्तव्य करत सभागृहात हशा पिकवला. तसेच विरोधकांवर टीकास्त्रही सोडले.

नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन विरोधक संंभ्रम निर्माण करत आहेत. सीएए बाबत मुस्लिम समाजातील नागरिकांना काही अडचण असेल, तर मी त्यांच्या पाठीमागे उभा राहीन, असं आश्वासन त्यांनी दिलं आहे.

दरम्यान, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर नसते तर देशाचं संविधान कसं असतं हे सांगता येत नाही. आंबेडकरांनी देशासाठी केलेलं कार्य कधीही न विसरता येणारं आहे, असं म्हणत आठवलेंनी बाबासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला.

महत्त्वाच्या बातम्या-

-…म्हणून मोदींनी सोशल मीडिया बंद करायला 8 दिवसांचा वेळ घेतला असेल- जितेंद्र आव्हाड

-मोदी भक्तांनो, तुम्ही सगळ्यांनीच सोशल मीडिया सोडला तर देश शांत होईल- नवाब मलिक

-मुस्लिम आरक्षणावर विश्व हिंदू परिषदेने डोळे वटारताच सेनेचा वाघ शांत!

-…म्हणून अरविंद केजरीवाल घेणार पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट!; भेटीकडे साऱ्यांचं लक्ष

-नातू हवा म्हणून सूनेचा छळ; राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल