महाराष्ट्र मुंबई

आता तुम्ही सत्ताधारी आहात नुसता शिमगा करु नका, प्रक्रिया पुर्ण करा -आशिष शेलार

मुंबई | आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र (आयएफएससी) गुजरातची राजधानी असलेल्या गांधीनगरला नेण्यासंबंधीची अधिसूचना केंद्र सरकारने काढली आहे. यावरून काँग्रेस, शिवसेनेने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर टीका केली आहे. याला भाजपचे नेते आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

आयएफएससी आजही मुंबईत शक्य आहे, असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. तसेच काहीजण काँग्रेसच्या तालावर आज टिपऱ्या खेळत असून आयएफएससीवरुन बेंबीच्या देटापासून ओरडत आहेत, असं म्हणत शेलारांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

आज गळे काढणार्‍यांनी 2007 ते 2014 दरम्यान काय केलं, असा सवाल शेलारांनी केला आहे. आयएफएससी आजही मुंबईत शक्य आहे. तसा प्रस्ताव आम्हीच दिला होता. आता तुम्ही महाराष्ट्राचे सत्ताधारी आहात नुसता शिमगा करु नका, असं आशिष शेलार म्हणाले आहेत.

दरम्यान, केंद्राला सांगा, केंद्राकडे मागा, त्यासाठीची प्रक्रिया पुर्ण करा. आम्ही सोबत आहोत, असंही आशिष शेलार म्हणाले आहेत.

 

 

महत्वाच्या बातम्या-

-राज्यातील पोलीस दलाला कोरोनाचा विळखा; एकूण 361 पोलिसांना कोरोनाची लागण

-“IFSC सेंटर गुजरातला हलवल्यास देशाचं मोठं आर्थिक नुकसान होईल”

-‘रडीचा डाव खेळू नका’; जयंत पाटलांचं भाजप नेत्यांना प्रत्युत्तर

-“IFSC च्या निमित्ताने ‘महाराष्ट्र विरुद्ध गुजरात’ अशी नवी स्क्रिप्ट लिहिली जातीये परंतू जनता मूर्ख नाही

-….तरच तुम्हाला प्रवासाचा पास मिळू शकतो, पुणे जिल्हाधिकाऱ्यांची माहिती