Top news महाराष्ट्र मुंबई

आम्हाला डोमकावळे म्हणताय, जनता तुम्हाला लबाड लांडगे म्हणते; शेलारांची टीका

मुंबई |  आजच्या सामनाच्या अग्रलेखातून शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपच्या आजच्या आंदोलनाची खिल्ली उडवली होती तसंच टीकेचे बाण सोडले होते. भाजप नेते आशिष शेलार यांनी राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.

दुसऱ्याच्या घरात डोकवून बघण्याची आपली सवय काही जात नाही. भाजपच्या आंदोलनावर आपली जर प्रतिक्रिया नसती तर आम्हाला चुकल्यासारखं वाटलं असतं. पण पत्रपंडित हो, आम्हाला तुम्ही डोमकावळे म्हणताय, पण तुम्हाला या महाराष्ट्रातील जनता लबाड लांडगे म्हणते आहे, अशा शब्दात शेलारांनी राऊतांना प्रत्युत्तर दिलं आहे.

सत्तेच्या मुळं ज्या झाडामुळे तुम्हाला मिळाली त्या झाडाची मुळं तुम्ही उखडायला निघालात म्हणूनच तुम्हाला लबाड लांडगे म्हटलं तर चालेल का? म्हणून दुसऱ्यावर बोट दाखवण्याअगोदर आपल्याकडे चार बोटं येतात हे लक्षात ठेवा, असं शेलार म्हणाले.

दुसरीकडे भाजपचे ‘महाराष्ट्र बचाव आंदोलन’ म्हणजे नेमके काय? ठाकरे सरकारच्या हाती महाराष्ट्र सुरक्षित असल्याची भावना जनतेची आहे. त्यामुळे सध्याच्या उठवळ विरोधी पक्षापासूनच महाराष्ट्राला वाचवा, असे सांगण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्र प्रकाशमान, तेजस्वी करण्याचे युद्ध सुरू असताना राज्य ‘काळे’ करण्याचे आंदोलन सुरू झाले आहे. डोमकावळ्यांचे हे फडफडणे औट घटकेचेच ठरेल, याविषयी आमच्या मनात शंका नाही, अशा शब्दात राऊत यांनी भाजपच्या आंदोलनाचा समाचार घेतला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-“…तर भारतातील कोरोना रुग्णांची संख्या 36 ते 70 लाखांवर गेली असती”

-निधीची गरज लागल्यास मागणी करा, तात्काळ देतो; अजितदादांचा पुणे महापौरांना शब्द

-अम्फान वादळाचा फटका, पंतप्रधानांकडून पश्चिम बंगालसाठी ‘इतक्या’ कोटींची मदत जाहीर

-खासगी रुग्णालयात होणारी रुग्णांची लूटमार थांबवण्यासाठी ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

-“घराचं रणांगण फक्त कौरवांनी केलं होतं आणि आज भाजपने”