महाराष्ट्र मुंबई

तो मी नव्हेच!; अशोक चव्हाणांचं ‘त्या’ पत्रावर स्ष्टीकरण

मुंबई | महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे सरकारमधील मंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिलं आहे आणि ते पत्र लिहिलंय बाळासाहेब थोरात यांना महाराष्ट्र काँग्रेसच्या अध्यक्षपदारून दूर करा या मागणीसाठी पत्र लिहल्याचं वृत्त आलं होतं. या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाणांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

सोनिया गांधी यांना मी एक पत्र लिहिल्यासंदर्भातील बातमी धादांत खोटी, खोडसाळ आणि जाणीवपूर्वक बदनामी करणारी आहे. मी असे कोणतेही पत्र लिहिलेले नाही. कृपया संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असं स्पष्टीकरण अशोक चव्हाण यांनी दिलं आहे.

काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी माझी वर्णी लावावी, अशी मागणी त्यांनी पत्राच्या माध्यमातून सोनिया गांधींकडे केल्याचं माहिती समोर आली होती. मात्र ती अफवा असल्याचं अशोक चव्हाण म्हणाले आहेत.

दरम्यान,  हे पत्र खरंच चव्हाण यांनी लिहिलं आहे का? आणि जर लिहिलं असेल तर त्यांना खरंच काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद हवं आहे का? पक्ष काय भूमिका घेतंय हे पाहणं महत्त्वाचं आहे.

 

 

महत्वाच्या बातम्या-

-मला शरद पवारांवर पीएचडी करायचीय- चंद्रकांत पाटील

-बास की आता उद्धवजी, सत्तेसाठी अजून किती लाचार व्हाल?- देवेंद्र फडणवीस

-इंदूरीकर महाराजांना आणखी एक जबर धक्का!

-… तर उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री या दोघांचं नक्की जमेल- शरद पवार

-औरंगाबाद दौऱ्यावर जाण्यापूर्वी राज ठाकरेंनी घेतले शिवशाहीर बाबसाहेब पुरंदरेंचे आशिर्वाद!