Loading...
औरंगाबाद महाराष्ट्र

अशोक चव्हाणांनी महिला दिनाच्या दिल्या खास अंदाजात शुभेच्छा; गायली ‘ही’ कविता

नांदेड | आज जगभरात जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. याचं औचित्यसाधत सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये एका कार्यक्रमात कविता सादर केली.

जन्म द्यायला आई पाहिजे, राखी बांधायला बहिण पाहिजे, गोष्टी सांगायला आजी पाहिजे, पुरणपोळी भरवायला मामी पाहिजे, आयुष्याच्या साथीला बायको पाहिजे पण हे सर्व करायच्या आधी एक मुलगी जगायला पाहिजे, अशी कविता अशोक चव्हाण यांनी सादर केली.

Loading...

जागतिक महिला दिनानिमित्ताने नांदेड पोलीस आणि महिला दक्षता समिती यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेडमध्ये विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

दरम्यान, या कवितेला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटाने प्रतिसाद दिला. यावेळी नांदेड पोलिसांच्यावतीने मुलींना सुरक्षा पेनचे वाटप करण्यात आलं.

महत्वाच्या बातम्या-

-गणेश नाईकांना कोरोना व्हायरसचे ब्रॅण्ड अ‌ॅम्बेसेडर करा; जितेंद्र आव्हाडांची टीका

-भ्रष्टाचार करणाऱ्यांचे हात तोडावे लागतील- बच्चू कडू

-अरे देवा…यांनी तर तुम्हालाही रांगेत उभं केलं; प्रकाश राज यांची टीका

-महिला दिनी जयंत पाटील फेसबुक लाईव्हद्वारे करणार कर्तृत्ववान महिलांच्या कार्याचा गौरव

-“मुख्यमंत्रीसाहेब, बारामतीकरांची तमा न बाळगता पंढरपूर-फलटण रेल्वे मार्गाला निधी द्या”

Loading...

 

Loading...