Loading...
देश

शाहीन बाग आंदोलनादरम्यान फुलल्या प्रेमाच्या कळ्या!

नवी दिल्ली | नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात (सीएए) दिल्लीतील शाहीन बागमध्ये गेल्या 51 दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. या पार्श्वभूमीवर देशभरातून अनेक लोक शाहीन बागला भेट देत आहेत. दरम्यान, शाहीन बाग तरुण-तरुणींसाठी प्रेम फुलण्याचं स्थळही बनल्याचं चित्र आहे.

15 डिसेंबर 2019 पासून शाहीन बागमध्ये महिलांचे शांततापूर्ण आंदोलन सुरु आहे. पथनाट्य, नाटक, सभा आणि भाषणांच्या माध्यमातून महिला सीएए आणि एनआरसीचा विरोध करीत आहेत. मात्र, आंदोलनाची ज्योत पेटत असताना तरुणांमध्ये प्रेमही फुलत आहे.

Loading...

वैद्यकीय शिक्षण घेणारे एक युगुल जुनैद आणि समर यांच्यामध्ये आंदोलनादरम्यान चर्चा सुरु झाली. ज्याचे नंतर प्रेमात रुपांतर झाले. याच्या प्रेमाला घरच्यांनी परवानगी दिली आहे. त्यामुळे ते दोघेही 7 फेब्रुवारी रोजी निकाह करत आहेत.

दुसरी जोडी जीशान-आयशा यांची आहे. या आंदोलनादरम्यान दोघांमध्ये चर्चा सुरु झाली त्यानंतर त्यांच्यात हळूहळू प्रेमाचा रंग चढायला लागला. आंदोलनादरम्यानच जीशान याने आयशाला लग्नाची मागणी घातली. ते 8 फेब्रुवारीला निकाह करणार आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-बॅकफूटला गेलेल्या भाजपला अखेर गुड न्यूज!

-मुंबई भाजपमध्ये अध्यक्ष हटवण्याच्या जोरदार हालचाली; या नेत्यांची नावे चर्चेत

-दिल्लीप्रमाणे आता महाराष्ट्रातही मोफत वीज!

-“भाजपचे अनेक माजी मंत्री शिवसेनेत जाण्याच्या तयारीत आहेत”

-दिल्ली नंतर भाजपचं महाराष्ट्रात ‘मिशन कमळ’?

Loading...