महाराष्ट्र मुंबई

“IFSC च्या निमित्ताने ‘महाराष्ट्र विरुद्ध गुजरात’ अशी नवी स्क्रिप्ट लिहिली जातीये परंतू जनता मूर्ख नाही”

मुंबई |  IFSC गुजरातला हलवण्याच्या मुद्द्यावरून सध्या काँग्रेस-राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये जोरदार वाकयुद्ध सुरू आहे. दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोपांची फैरी झडल्या जात आहे. भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर IFSC च्या मुद्द्यावरून टीकास्त्र सोडलं आहे.

IFSC च्या निमित्ताने ‘महाराष्ट्र विरुद्ध गुजरात’ अशी नवी स्क्रिप्ट लिहिली जाते आहे. परंतु जनता मूर्ख नाही. 2009 मध्ये IFSC चा प्रस्ताव नाकारल्याबद्दल दोन्ही कॉंग्रेसने राज्याच्या जनतेची माफी मागावी, अशी मागणी करत शिवसेनेच्या बोलभांड नेत्यांनी त्यांना जाब विचारण्याची हिम्मत दाखवावी, असं अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील IFSC च्या मुद्द्यावरून काँग्रेस राष्ट्रवादीवर टीकास्त्र सोडलं आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रासंबंधी भ्रम पसरवण्याचा प्रयत्न सुरु आहे. आपलं अपयश लपवण्यासाठी छाती बडवण्याचा हा प्रकार आहे. नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर कायम टीका करण्यासाठी काही लोकांना केवळ सोयीच्या गोष्टींचं स्मरण होतं, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून मुंबईतून सेंटर हलवण्याला आपला विरोध दर्शवला आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पंतप्रधान कार्यालयाला त्यासंबंधीचं सविस्तर पत्र लिहिलं आहे. मुंबई ही देशाची अर्थिक राजधानी आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील मुंबईला आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचं स्थान आहे. अशावेळी मुंबईत होणारं IFSC सेंटर डायरेक्ट गुजरातला हलवणं म्हणजे मुंबईचं महत्व कमी करण्याचा प्रयत्न यामधून केला गेला असल्याचा निशाणा त्यांनी केंद्र सरकारवर साधला आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

-….तरच तुम्हाला प्रवासाचा पास मिळू शकतो, पुणे जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

-IFSC गुजरातला हलवण्याच्या मुद्द्यावरून, शरद पवारांच पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र

-नागरिकांनो घाबरू नका… कोरोना बरा होतोय; उपचारानंतर डॉक्टरांनी निभावला पुन्हा रूग्णसेवेचा धर्म

-राज ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यात तथ्य- नितीन गडकरी

-…म्हणून फक्त परप्रांतीयांनाच मुंबई आणि पुण्यातून जाता येणार