Top news

गोपीचंद पडळकरप्रकरणी उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले….

सातारा | भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याबाबत बोलताना कोणी कोणाबद्दल काय बोललं हे त्यांनी मला विचारुन बोलले नाहीत. माझं मत मी परखडपणे मांडत असतो, असं खासदार उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे. शरद पवार आणि पडळकर त्यांचं ते बघून घेतील, असंही उदयनराजेंनी म्हटलं आहे.

उदयनराजे भोसले यांनी आज साताऱ्यात जिल्हा मध्यवर्ती बँकेत जाऊन त्याचे बंधू आमदार शिवेंद्रराजे भोसले यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीनंतर उदयनराजेंनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

ज्यांनी कुणावर टीका केली, त्याच्यावर त्यांना त्यांना विचारा. जे कुणी उत्तर देणार आहेत ते मला विचारुन देणार नाहीत, असं उदयनराजेंनी म्हटलंय.

उदयनराजेंनी यावेळी बोलताना कोरोना परिस्थितीवरही भाष्य केलं. साताऱ्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्याबाबत विचारलं असता, कोरोनाचा बाऊ केला जात आहे, असं उदयनराजे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

-टिकटॉकवरच्या बंदीनंतर कंपनीची प्रतिक्रीया, म्हणाले…

-अ‍ॅपल आणि गुगलचा TikTok ला दणका; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

-“या युद्धात शरद पवार यांनी एक काडी टाकली अन्…..”

-केंद्र सरकारकडून अनलॉक-2 ची नियमावली जारी; कंटेनमेंट झोनमधील निर्बंध कायम

-गुड न्यूज! कोरोनावरील पहिली लस भारतात तयार