Top news देश

लाऊडस्पीकरद्वारे अजान देणं हा इस्लामचा भाग नाही आणि ते अनिवार्य नाही- अलाहाबाद उच्च न्यायालय

alahabad court

लखनऊ | उत्तर प्रदेशातील गाझिपूरसह तीन जिल्ह्यांच्या मशिदींमध्ये अजानच्या बंदीसंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करताना अलाहाबाद उच्च न्यायालयाने शुक्रवारी महत्त्वपूर्ण निर्णय दिला. लाऊडस्पीकरद्वारे अजान देणं हा इस्लामचा भाग नाही आणि ते अनिवार्यही नाही, असं सांगत मशिदींमध्ये तोंडी अजानसाठी परवानगी आहे, परंतू लाऊडस्पीकरवरुन अजानसाठी परवानगी देण्यात आलेली नाही.

अलाहाबाद हायकोर्टाने गाझिपूर, हाथरस आणि फर्रुखाबाद जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश रद्द करत मशिदींमध्ये तोंडी अजानसाठी परवानगी दिली आहे, परंतू लाऊडस्पीकरवरुन अजानसाठी परवानगी दिली नाही.

अजान लाऊडस्पीकर किंवा इतर कोणत्याही उपकरणांशिवाय मानवी आवाजात मशिदींमधून पठण करु शकतात. लाऊडस्पीकरद्वारे अजान देणं हा इस्लामचा भाग नाही. लाऊडस्पीकर नव्हते त्यावेळीही अजान होत होती, असा निर्णय न्यायमूर्ती शशिकांत गुप्ता आणि न्यायमूर्ती अजित कुमार यांच्या खंडपीठाने दिला.

लाऊडस्पीकरद्वारे अजान देणं हा इस्लामचा भाग नाही. लाऊडस्पीकर नव्हते त्यावेळीही अजान होत होती. लाऊडस्पीकरवरील बंदी योग्य असून हे धार्मिक स्वातंत्र्याचं उल्लंघन नाही. अजान धार्मिक अभिव्यक्ती स्वातंत्र्याशी संबंधित असून या अधिकाराचं उल्लंघन करण्याचा कोणालाही अधिकार नसल्याचं न्यायालयाने सांगितलं आहे.

जिल्हा प्रशासन सकाळी 10 ते सकाळी 6 या वेळेत लाऊडस्पीकर वापरण्यास परवानगी देऊ शकत नाही. त्याशिवाय, मशिदीत लाऊडस्पीकरद्वारे अजान वाचण्यासाठी प्रशासनाची परवानगी घेणं आवश्यक असेल. प्रशासनाच्या परवानगीशिवाय लाऊडस्पीकरद्वारे अजान वाचणं बेकायदेशीर ठरेल असंही न्यायालयाने म्हटलं आहे.

 

 

महत्वाच्या बातम्या-

-आदित्य ठाकरेंना कुणीतरी प्रोटोकॉल सांगा, बालिश बुद्धी पुन्हा सिद्ध करून दाखवली- निलेश राणे

-LOCKDOWN- 4 : पाहा कसा असेल महाराष्ट्रातलं चौथं लॉकडाऊन…

-गुजरातमध्ये परप्रांतीय कामगारांचा पुन्हा उद्रेक; भरुचमध्ये पोलिसांवर दगडफेक

-कोणतीही परीक्षा न घेता मेडिकलच्या जवळपास 30 हजार जागा भरणार- राजेश टोपे

-मोदी सरकारकडून शेतकऱ्यांसाठी 11 महत्त्वाच्या घोषणा