दिल्लीत जशी मोफत वीज तशी आता महाराष्ट्रातही; सरकार निर्णय घेण्याच्या तयारीत

मुंबई |  राज्यात विजेचा दरमहा 100 युनिटपर्यंत वापर करणाऱ्या ग्राहकांना मोफत वीज देण्याच्या निर्णयावर राज्य सरकार विचाराधीन असल्याची माहिती ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली आहे. त्यामुळे दिल्लीप्रमाणे महाराष्ट्रातही मोफत विज मिळण्याची शक्यता आहे.

महावितरणसह तिन्ही वीज कंपन्यांना त्यांच्या खर्चात कपात करण्यास सांगितले असून त्यासाठीची योजनाही मागविण्यात आल्याची माहिती राऊत यांनी दिली आहे. तसेच विजग्राहक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची चर्चाही केली असल्याचं राऊत यांनी सांगितलं. ते माध्यमांशी बोलत होते.

दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल सरकारतर्फे 200 युनिटपर्यंत विज मोफत दिली जाते. त्याचाच आदर्श घेत राज्यात 200 युनिटपर्यंत वीज मोफत देण्याचा विचार आहे. मात्र, सध्या 100 युनिटपर्यंत विज या वर्षाच्या शेवटपर्यंत ग्राहकांना दिली जावी यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याची माहिती राऊत यांनी दिली आहे.

दरम्यान, 100 युनिट विज मोफत मिळणार असेल तर महाराष्ट्राच्या जनतेसाठी ती दिलासादायक बाब आहे. त्यामुळे ही योजना कधी अमलात येते हे पाहावं लागेल.

महत्वाच्या बातम्या-

-“भाजपचे अनेक माजी मंत्री शिवसेनेत जाण्याच्या तयारीत आहेत”

-दिल्ली नंतर भाजपचं महाराष्ट्रात ‘मिशन कमळ’?

-केजरीवाल सरकारचं ‘दिल्ली मॉडेल’ इतर राज्यांत राबवा; शिवसेनेचा नरेंद्र मोदींना सल्ला

-आम्ही कधी एकमेकांवर कंबरेखालचे वार केले नाहीत; आव्हाडांचे भाजपवर टीकास्त्र

-मुख्यमंत्रीसाहेब, प्रथम स्वत:च्या अंगणातील घुसखोरांना हाकला; शिवसेनेला मनसेचं जाहीर आव्हान