ते औषध कोरोनावर नाही?; रामदेवबाबांच्या औषधाबाबत धक्कादायक खुलासा

नवी दिल्ली | पतंजलीचे सर्वोसर्वा बाबा रामदेव यांनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेऊन पतंजलीनं तयार केलेल्या कोरोनावरील औषधाची माहिती दिली होती. आता या औषधाबाबत नवा धक्कादायक खुलासा एका वृत्तवाहिनीनं केला आहे.

बाबा रामदेव यांच्या पतंजलीनं या औषधाच्या मान्यतेसाठी केंद्रीय आयुष मंत्रालयाकडे अर्ज केला आहे. मात्र या अर्जात हे औषध कोरोनासाठी आहे, याचा कुठेही उल्लेख केलेला नाही, अशी नवी माहिती समोर आली आहे. तर मूळ अर्जात हे औषध रोगप्रतिकारशक्ती वाढवणारं तसेच सर्दी आणि तापासाठी असल्याचं म्हटलंय.

रामदेव बाबांच्या या कोरोनावरील औषधावर अनेक प्रश्नचिन्हं उपस्थित करण्यात आलेली आहेत. आपण अशा कुठल्याही औषधाला अद्याप मान्यता दिलेली नाही, असं आयुष मंत्रालयानं स्पष्ट केलं होतं, तसेच या औषधाची जाहिरात थांबवण्याचे आदेश या मंत्रालयानं दिले होते.

दरम्यान, बाबा रामदेव यांनी हे औषध कोरोनावर अत्यंत गुणकारी असल्याचा दावा केला होता. या औषधामुळे कोरोनाचे रुग्ण तीन दिवसात बरे झाल्याचाही त्यांचा दावा आहे.

 

-मुख्यमंत्र्यांनी एकाच दगडात मारले दोन पक्षी, राष्ट्रवादीच्या इच्छेनुसार मुख्य सचिवांची बदली तर….

-शरद पवारांच्या पायाच्या धुळीची तरी लायकी आहे का त्या पडळकरची- जितेंद्र आव्हाड