महाविकास आघाडीचं सरकार त्यांच्या मरणाने मरेल; त्यांचं लवकरच सीझर – बबनराव लोणीकर

परभणी | भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी महाराष्ट्र पुन्हा काबीज करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु केल्याची माहिती मिळत आहे. राज्यात ऑपरेशन कमळला पुन्हा एकदा सुरूवात होणार आहे, अशी जोरदार चर्चा आहे. यावर भाजपला राज्यामध्ये कोणतंही ऑपरेशन राबवण्याची गरज नाहीये तर लवकरच महाविकास आघाडीचंच सीझर होणार आहे. सरकार त्यांच्या मरणाने मरणार आहे, अशी जोरदार टीका माजी मंत्री आणि भाजप नेते बबनराव लोणीकर यांनी केली आहे.

परभणीत कृषी संजीवनी महोत्सव आयोजित केला आहे. या महोत्सवाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. सरकारने महाराष्ट्राच्या भावना दुखावल्या आहेत. राज्यातील जनतेच्या भावनांशी हे सरकार खेळत आहे. महापालिका, नगरपालिका, पाणीपुरवठा, रस्ते यांमधल्या प्रत्येक विकासकामाला सरकार स्थगिती देतंय. आता फक्त जेवायला आणि आंघोळीला स्थगिती दिली एवढचं ऐकायचं बाकी राहिलंय, अशी टीका त्यांनी राज्य सरकारवर केली.

महाविकास आघाडीची तीन चाकांची रिक्षा जास्त दिवस चालणार नाही. रोज एक मंत्री रूसतोय. पहिल्यांदा आम्ही ऐकत होतो की पोळ्याला बैल रूसतो किंवा शेवंतीवेळी नवरदेव रूसतो मात्र सरकारमध्ये आता रोज एक मंत्री रूसतोय हे चांगल्या सरकारचं लक्षण नाही, असं लोणीकर म्हणाले.

दरम्यान, केंद्र सरकारला देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या कर्तबगार नेत्याची आवश्यकता असेल तर देशालासुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचा उपयोग होईल, असं मतं त्यांनी मांडलं.

महत्त्वाच्या बातम्या- 

-शाहीन बाग आंदोलनादरम्यान फुलल्या प्रेमाच्या कळ्या; दोन जोड्या करतायत लग्न

-बॅकफूटला गेलेल्या भाजपला अखेर गुड न्यूज!

-मुंबई भाजपमध्ये अध्यक्ष हटवण्याच्या जोरदार हालचाली; या नेत्यांची नावे चर्चेत

-दिल्लीप्रमाणे आता महाराष्ट्रातही मोफत वीज!

-“भाजपचे अनेक माजी मंत्री शिवसेनेत जाण्याच्या तयारीत आहेत”