सरकारमधून बाहेर पडा म्हणणाऱ्या अब्दूल सत्तारांना बच्चू कडूंचं जोरदार प्रत्युत्तर

औरंगाबाद | अब्दूल सत्तार यांना सरकारमधून बाहेर पडा, असं सांगण्याचा अधिकार नाही. त्यांनी आपले अधिकार तपासूण पाहावेत, असं म्हणत आमदार बच्चू यांनी  शिवसेनेचे नेते आणि महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय.

बच्चू कडू यांनी राज्य सरकारची दोन लाखांची शेतकरी कर्जमाफी ही बुजगावणी आहे, अशी टीका केली होती. या टीकेवरुन शिवसेनेचे नेते आणि महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी बच्चू कडूंना सरकारमधून बाहेर पडण्याचा सल्ला दिला आहे. त्यांच्या याच वक्तव्याचा बच्चू कडू यांनी जोरदार समाचार घेतला आहे.

एक राज्यमंत्री आणि आमदार म्हणून स्थानिक पातळीची वस्तुस्थिती सरकारपर्यंत घेऊन जायची ही माझी जबाबदारी आहे. यामध्ये आम्ही काही सरकारवर दोषारोप केले नाहीत, असं बच्चू कडू यांनी सांगितलं.

दरम्यान,  शासनाकडून काही चुका होत आहेत त्या चुका सरकारने दुरुस्त कराव्यात, असं बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-महात्मा गांधींचा पुतळा पडलेल्या अवस्थेत आढळला; या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण

-…तर राज ठाकरेंच्या मोर्चाला आमचा पाठिंबा असेल- राजू शेट्टी

-“केजरीवालांचा पराभव होणार, असं झालं नाही तर…”

-उद्योजकांना त्रास देणाऱ्यांना मोक्का लावा- अजित पवार

-मनसेनं कधीही हिंदुत्व सोडलेलं नव्हतं- शर्मिला ठाकरे