Loading...
महाराष्ट्र मुंबई

कर्जमाफीच्या हिशेबात बँकांचा घोळ- बच्चू कडू

मुंबई |  शेतकरी कर्जमाफीच्या हिशोबात बँकांकडून जाणूनबूजून गडबड होत असल्याच्या अनेक तक्रारी शेतकऱ्यांनी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडे केल्या आहेत. या तक्रारीची दखल घेत बच्चू कडू यांनी सरकारकडे एक धक्कादायक अहवाल सादर केला आहे.

एखाद्या शेतकऱ्याने पन्नास हजाराचं कर्ज घेतलं असलं तर बँकांनी त्यावर एक ते दीड लाख व्याज लावलेलं आहे. नियमानुसार कर्जाऊ घेतलेल्या रकमेच्या दुप्पट व्याज आकारलं जाऊ शकतं, त्याहून अधिक नाही. मात्र, काही जिल्हा व राष्ट्रीय बँकांनी तीन ते चारपट व्याज लावल्याचं बच्चू कडू यांच्या निदर्शनास आलं आहे. बच्चू कडू यांनी हा धक्कादायक अहवाल राज्य सरकारडे सादर केल्याचं सांगितलं आहे.

Loading...

शेतकऱ्याने जितकं कर्ज घेतलं आहे, त्याच्या दुपटीपेक्षा जास्त व्याज बँकांना आकारता येत नाही. अशा काही तक्रारी माझ्याकडे आल्या होत्या. यासंदर्भात सरकारकडे अहवाल दिला आहे, असं त्यांनी म्हटलंय.

दरम्यान, शेतकरी कर्जमाफीची यादी सरकार जाहीर करत असताना दुसरीकडे बँकांकडून शेतकऱ्यांची फसवणूक होते आहे की काय? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-कोर्टात जाताना हिंगणघाटच्या आरोपीने केली ‘ही’ इच्छा व्यक्त!

-शालिनीताईंचा अजित पवारांशी पंगा; तात्काळ सत्तेवरून हटवण्याची राज्यपालांकडे मागणी

-मुलांच्या चांगल्या शिक्षणासाठी ‘आप’ला मतदान करा; मतदानादिनी दिल्लीच्या उपमुख्यमंत्र्यांचं ट्वीट

-काश्मिरची सुरक्षा महत्त्वाची… इंटरनेट हा मुलभूत अधिकार नाही- प्रसारण मंत्री

-मुख्यमंत्री असताना फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी केलेली ‘ती’ घोषणा फसवी!

Loading...