Loading...
औरंगाबाद महाराष्ट्र

“महाराज कीर्तनातून नेहमी चांगले उपदेश देतात, त्यांच्याबद्दल सरकारची भूमिका वाईट नाही”

उस्मानाबाद |  प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून त्यांच्यावर गेली आठवडाभर टीकेची झोड उठली आहे. परंतू एका वक्तव्याने माणूस वाईट होत नाही, अशी म्हणणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. महाराज कीर्तनातून नेहमी चांगले उपदेश देतात. त्यांच्याबद्दल सरकारची भूमिका वाईट नाही. त्यांच्याकडून काही चूक झाली असेल तर ती चूक दुरूस्त करण्याचं काम सरकार करेल, असं ठाकरे सरकारमधील राज्यमंत्री बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

महाराजांच्या वक्तव्यामागे त्यांचा नेमका उद्देश काय होता, हे तपासणं गरजेचं आहे. नोटीस देणं म्हणजे गुन्हा दाखल करणं होत नाही. कायदेशीर कारवाई होऊ शकते पण त्यांच्याबद्दल सरकारची भूमिका वाईट नसल्याचं कडू म्हणाले आहेत.

Loading...

कायदा हा सर्वांसाठी समान आहे. मग महाराज असतील किंवा मी असेल… परंतू 2 तासांच्या कीर्तनातून एखादा शब्द वाईट गेला असेल आणि त्यावर कुणी तक्रार दाखल करत असेल, तर विषय गंभीर आहे, असंही ते म्हणाले आहेत.

आपल्या देशात एखादा शह्द पकडणं आणि तोच शब्द पुन्हापुन्हा दाखवणं ही चुकीची सवय लागली असल्याचंही कडू म्हणाले. बच्चू कडू यांनी एकप्रकारे इंदुरीकर महाराजांचं समर्थनच केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-इंदुरीकर महाराजांच्या बोलण्यात काही आक्षेपार्ह आहे असं मला वाटतं नाही- रूपाली पाटील

-महाराज फक्त आवाज द्या…. ताकदीनिशी रस्त्यावर उतरतो- महेश लांडगे

तृप्ती देसाईंवर टीका करणाऱ्या इंदुरीकर भक्तांचा किशोरी शहाणेंनी घेतला खरपूस समाचार!

-ऐ भावा, इंदुरीकरांची कसली भारी हवा….. चाहत्यांनी बैलगाडीतून काढली मिरवणूक!

-पुण्यातली ‘सविताभाभी’ सापडली… दुसरी तिसरी कुणी नाही, ती आहे सई ताम्हणकर!!

Loading...