मुस्लीम आरक्षणासंदर्भात बोलताना बोळासाहेब थोरात म्हणतात…

मुंबई |  राज्यात शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशासाठी मुस्लीम समाजातील विद्यार्थ्यांना पाच टक्के आरक्षण देण्याबाबतची घोषणा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी काल विधान परिषदेत केली होती. त्यांनतर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मुस्लीम आरक्षणासाठी काँग्रेस आग्रही असल्याचं म्हटलं आहे.

विधान परिषदेत नवाब मलिक यांनी मुस्लीम आरक्षणाबाबत आघाडी सरकारची भूमिका मांडली. तीच भूमिका काँग्रेस पक्षाची आहे, असं थोरात यांनी स्पष्ट केलं आहे. ते माध्यमांशी बोलत होते.

राज्यात आघाडी सरकार असताना या पूर्वीच मुस्लीम समाजाला सरकारी नोकऱ्या व शिक्षणात पाच टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे आमची भूमिका स्पष्ट आहे, असंही ते म्हणाले आहेत.

दरम्यान, 2014 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने मुस्लिमांना शैक्षणिक संस्थांमध्ये 5 टक्के आरक्षण दिले होते. तसेच महाविकास आघाडी सरकारच्या जाहीरनाम्यात मुस्लिमांना शैक्षणिक आणि नौकरीमध्ये आरक्षण देण्याचे आश्वासन देण्यात आले होते.

महत्वाच्या बातम्या- 

-राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी ही 2 नावं निश्चित; या बड्या नेत्याला डच्चू?

-सरकारी कर्मचाऱ्यांचा 5 दिवसांचा आठवडा होण्याआधीच त्याविरोधात न्यायालयात याचिका

-पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; दहा रुपये भरा अन् पीएमपीचा प्रवास दिवसभर करा!

-सोनियांनी आम्हाला राजधर्म शिकवू नये; भाजपचा पलटवार

-मुस्लिमद्वेषातून फडणवीसांचा आरक्षणाला विरोध; काँग्रेसचा निशाणा