पीडितेला लवकरात लवकर न्याय देणार- बाळासाहेब थोरात

वर्धा |  हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेच्या मृत्यूची बातमी अत्यंत वेदनादायी आहे. या प्रकरणी सरकार पीडित कुटुंबाच्या पाठीशी भक्कमपणे उभे असून त्यांना न्याय देण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल, अशी प्रतिक्रिया महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

हिंगणघाटसारखी घटना पुन्हा घडू नये आणि आरोपीला जरब बसावी यासाठी आणखी कठोर कायदा करण्याचेही राज्य सरकारचे प्रयत्न सुरु आहेत, अशी माहिती थोरात यांनी दिली आहे. यासंदर्भातील खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी यासाठी राज्य सरकारने ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांच्याकडे हे प्रकरण सोपवले आहे, असंही थोरात यांनी सांगितलं.

पीडितेला वाचवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले. तिला चांगल्या आरोग्य सुविधाही देण्यात आल्या होत्या. परंतु, तिला वाचवण्यात अपयश आले याचे दुःख आहे. या कठीण प्रसंगी राज्य सरकार आणि काँग्रेस पक्ष पीडित कुटुंबियांच्या सोबत असल्याचं थोरात म्हणाले.

दरम्यान, पीडितेला लवकरात लवकर न्याय देण्याचा राज्य शासन प्रयत्न करेल, असं जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या-

-‘या’ सदस्याच्या निधनानंतर ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’वर शोककळा

-ती आपल्यातून निघून गेली, पण नराधमाला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी- देवेंद्र फडणवीस

-मी हिरोपेक्षा काही कमी नाही- अशोक चव्हाण

-“आज ती जळाली नाही समाजाचा व व्यवस्थेचा बुरखा जळाला; हिंगणघाटच्या निर्भयाचा आज वेदनादायी अंत झाला”

-पुण्यात अ‌ॅसिड टाकण्याची धमकी देत विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार