“प्रसिद्धी स्टंट बंद करून कोरोना विरोधात काहीतरी ठोस पावलं उचला”

मुंबई |  पंतप्रधान मोदींनी आज पुन्हा एकदा जनतेशी संवाद साधला आणि पुन्हा सर्व देशवासीयांना एक आवाहन केलं आहे. यावरून  मोदींवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. अशातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही मोदींवर टीका केली आहे.

देशात कोरोना विषाणूने थैमान घातले असून देश एका गंभीर संकटाचा सामना करत आहे. अशा गंभीर संकटावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही महत्वाचे धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे. दिवे लावा, टाळ्या वाजवा असे आवाहन करण्याचे काम पंतप्रधानांचे नसून त्यांनी आतातरी गंभीर व्हायला हवे, अशी खरमरीत टीका बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

कोरोनाचा सामना करण्यासाठी डॉक्टर, मेडीकल स्टाफ, पोलीस यंत्रणेसह सर्वजण आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत. त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून त्यांना आवश्यक असलेली मदत करणे ही आजची गरज आहे. त्यासाठी केंद्र सरकारकडून भरघोस आर्थिक मदतीबरोबर सर्वप्रकारचे सहाय्य देण्यास प्राधान्य देणे हे त्यांचे काम आहे, असं थोरातंनी सांगितलं आहे.

दरम्यान, दिवे लावणे, टाळ्या वाजवणे असे इव्हेंट करणे नाही. हे सर्व पाहता नरेंद्र मोदी पंतप्रधान असल्यासारखे वागणार आहेत का? असा सवाल उपस्थित होत असल्याचं थोरात यांनी म्हटलं आहे.

 

महत्वाच्या बातम्या –

-“भारतीयांची प्रतिकारशक्ती उत्तम आहे, ते नक्कीच कोरोनाला हरवतील”

-“नका सतत दोष काढू! फक्त 9 मिनिटं पणती, दिवा लावायचा आहे”

-“तबलिगी जमातीच्या सदस्यांना गुन्हेगारांप्रमाणे वागवू नये.. ही सरकारची जबाबदारी”

-महाराष्ट्रातील 1400 जणांची निजामुद्दीनला हजेरी; आरोग्यमंत्र्यांची खळबळजनक माहिती

-मोदीसाहेब, आपण पंतप्रधान आहात की इव्हेंट मॅनेजर??- रूपाली चाकणकर