मंकीपॉक्सने जगाचं टेंशन वाढवलं, ‘ही’ लक्षणं आढळल्यावर वेळीच व्हा सावध!

मुंबई | धोकादायक मांकीपॉक्स जगभर वेगाने पसरत आहे. आता स्वित्झर्लंड आणि इस्रायलमध्ये या विषाणूची नवीन प्रकरणे आढळून आली आहेत. दोन्ही देशांनी याला अधिकृत दुजोरा दिला आहे.

हा विषाणू अनेक युरोपियन आणि उत्तर अमेरिकन देशांमध्ये आढळून आला आहे. विशेषतः आफ्रिकन देशांतून परतलेल्या लोकांवर याचा परिणाम होत आहे.

मंकीपॉक्स विषाणूसाठी अनेक प्राण्यांच्या प्रजाती जबाबदार असल्याचं दिसून आलं आहे. या प्राण्यांमध्ये खार, उंदीर, डर्मिस, नॉन-ह्युमन प्राइमेट्स आणि इतर प्रजातींचा समावेश आहे.

मानवांमध्ये मंकीपॉक्स प्रथम 1970 मध्ये कॉंगो मधील 9 वर्षांच्या मुलामध्ये सापडला होता. त्यानंतर या विषाणूची आणखी प्रकरण वाढली.

ताप, तीव्र डोकेदुखी, सुजलेल्या लिम्फ नोड्स, पाठदुखी, स्नायू दुखणे आणि अशक्तपणा यासारखी लक्षणं यामध्ये आढळतात. त्वचेचा त्रास सामान्यतः ताप आल्यानंतर 1 ते 3 दिवसांच्या आत सुरू होतो.

अलिकडच्या आठवड्यात, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, बेल्जियम, इटली, पोर्तुगाल, स्पेन आणि स्वीडन तसेच अमेरिका, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियामध्ये मंकीपॉक्सची 100 हून अधिक संशयित प्रकरणे आढळून आली आहेत. अशा परिस्थितीत हा विषाणू पसरण्याची शक्यता बळावली आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

“मी राज ठाकरेंना 2008 पासून शोधतोय, जर ते कधी भेटलेच तर…” 

“6 व्या जागेची उद्या शिट्टी वाजेल, आम्ही निरोपाची वाट बघत नाही” 

“…म्हणून या सरकारचं नाव जुम्मे के जुम्मे सरकार”

‘तोपर्यंत आम्ही झोपणार नाही आणि झोपूही देणार नाही’; फडणवीस कडाडले

‘दौरे रद्द करून मुख्यमंत्री बनता येणार नाही’, शिवसेनेची बोचरी टीका