Loading...
नागपूर महाराष्ट्र

महाराज भागवत कथा सांगायला आला अन् बाईला घेऊन पळाला!

भंडारा |  आपल्या मधुर वाणीने गावात भागवत कथा सांगायला आलेल्या महाराजांनी गावाला मंत्रमुग्ध केलं पण सप्ताह संपताच महाराज गावातील एका विवाहितेला घेऊन पसार झाला. हा धक्कदायक प्रकार घडलेला आहे भंडाऱ्यात! महाराजांच्या या रंगेल वागण्यावर आता गावकरी चांगलेच संतापले आहेत.

भंडारा जिल्ह्यातील मोहूरदा येथे दर सालाप्रमाणे 27 जानेवारी ते 3 फेब्रुवारीपर्यंत भागवत सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं. भागवत कथेत महाराजांनी आपल्या वाणीने सगळ्यांना मंत्रमुग्ध केलं. याच काळात त्याची नजर एका महिलेवर गेली. महाराजांनी या महिलेला आपल्या मोहजालात फसवली अन् तिला घेऊन पसार झाला.

Loading...

भंडाराजवळच्या मोहूदरा येथील ही घटना आहे. पळून गेेलेल्या या महाराजाचा आणि विवाहितेचा पोलीस शोध घेत आहे. दिनेश मोहतुरे असं या महाराजाचं नाव आहे. घडलेल्या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे

सप्ताहाचा कार्यक्रम चालू असताना महाराजांनी संबंधित महिलेच्या कुटुंबाशी चांगले संबंध प्रस्थापित केले अन् त्याच काळात विवाहित महिलेला नादी लावलं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे विवाहित महिलेला 5 वर्षांची मुलगी आहे. पळून गेलेल्या महिलेच्या कुटुंबाला मात्र याचा जबर धक्का बसला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-CAA, NRC मागे घेत नाही तोपर्यंत उठणार नाही; नागपाड्यातल्या आंदोलक महिलांचा एल्गार!

-कोपर्डी खटल्याच्या महत्वाच्या सुनावणीला वकील गैरहजर; संभाजीराजे संतापले

-माझ्या भोवती महिला भगिणींचं कवच… मज काय कुणाची भिती- नरेंद्र मोदी

-कर्जमुक्ती करून आपण शेतकऱ्यांवर उपकार करत नाही- उद्धव ठाकरे

-बजेटवरून माजी अर्थमंत्र्यांच्या टीकेचा बाण आजी अर्थमंत्र्यांवर!

Loading...