Loading...
महाराष्ट्र मुंबई

“देशाच्या वैभवकाळाला आणि पतनाला हिंदूच जबाबदार आहे”

मुंबई | देशाच्या हजारो वर्षाच्या इतिहासाचा साक्षीदार हिंदू समाज आहे. केवळ साक्षीदार नाही तर त्याच कारण पण हिंदू समाज आहे. देशाच्या वैभवकाळाला आणि पतनाला हिंदूच जबाबदार आहे. देशाचं आणि हिंदुंचं भाग्य एकच असून नकारात्मकतेला हिंदू समाजामध्ये स्थान नाही, असं वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाहक भैयाजी जोशी यांनी केलं आहे.

गोव्यात आयोजित विश्वगुरु भारत: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दृष्टिकोनातून कार्यक्रमात जोशी बोलत होते.

Loading...

भारतासारखा अत्याचार कोणत्याही देशावर झालेला नाही. परकीय आक्रमणाच्या प्रतिकूल परिस्थितीतही भारताने आपले अस्तित्व टिकवून ठेवलं. भारत अनंत काळापासून आहे आणि अनंत काळापर्यंत राहणार आहे. हे भारताचे भाग्य आहे, असं जोशी यांनी म्हटलं आहे.

भारत कधी संपणार नाही, हिंदू समाज नष्ट होणार नाही. जगाला समन्वयाच्या मार्गावर चालायला शिकवण्याचे दायित्व भारत आणि हिंदू समाजावर आहे. समाजातील प्रश्न समजणारे आणि प्रश्नावर उत्तर शोधणारे स्वयंसेवक संघाने निर्माण केलं असल्याचंही जोशी यांनी यावेळी बाेलताना सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या- 

-…अन् लालकृष्ण अडवाणींना झाले अश्रू अनावर; पाहा व्हिडीओ

-शरद पवारांनी सांगितलेला ‘तो’ किस्सा एैकताच उपस्थितांमध्ये हशा पिकला

-छ. शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात लालसी सरकारने आमच्या भगिनींची सुरक्षा वाऱ्यावर सोडली- चंद्रकांत पाटील

-उद्धवजी, शेतकऱ्यांच्या बांधावर गेल्यावरच कळेल किती आक्रोश आहे- राजू शेट्टी

-“शरद पवार सिर्फ नामही काफी है. महाराष्ट्राचा हा नेता जेव्हा दिल्लीत उभा राहतो तेव्हा दिल्लीलाही झुकावं लागतं”

Loading...