मुंबई | हनुमान चालिसावरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलेलं आहे. आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी हनुमान चालिसाचा भोंगा लावल्याने आता मुंबईत तणावाचं वातावरण आहे.
शिवसैनिकांनी काल रात्री मातोश्रीबाहेर जागता पहारा दिला. शिवसैनिकांची आक्रमक भूमिका पाहिल्यावर राणा दाम्पत्यांनी एक पाऊल मागे टाकत आंदोलन मागे घेतलं. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याचं कारण देत त्यांनी आंदोलन मागे घेतलं आहे.
असं असलं तरी राणा दाम्पत्यांना खार पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्यानंतर त्यांना अटक देखील करण्यात आली आहे. खार पोलीस चौकीबाहेर सध्या तणावाचं वातावरण दिसत आहे.
शिवसैनिकांचा राग अद्याप शांत झालेला दिसत नाही. शिवसैनिक जोरजोरात घोषणाबाजी करत आहेत. अशातच आता पोलिस ठाण्यातून मोठी माहिती समोर आली आहे.
नवनीत आणि रवी राणा यांनी खार पोलीस चौकीत थेट जशात तस उत्तर देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्याचबरोबर शिवसेना खासदार संजय राऊत आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्या विरोधात देखील तक्रार दाखल करण्यात आली आहे.
दरम्यान, 500 ते 600 शिवसैनिकांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे आता शिवसैनिकांचा आक्रोश आणखीनच वाढण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
आत्ताची मोठी बातमी! राणा दाम्पत्यास अखेर अटक; पोलीस स्टेशनबाहेर तणावाचं वातावरण
“मर्द आहात ना?…”, नारायण राणेंचा शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल
“…म्हणून राज ठाकरेंच्या सभेला परवानगी देऊ नये”
शेवटच्या ओव्हरला राडा! कुलदीप मैदान सोडून निघाल्यावर युझीने केलं असं काही की…; पाहा व्हिडीओ
समान नागरी कायद्यावर गृहमंत्री अमित शहा यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…