Top news महाराष्ट्र मुंबई राजकारण

मोठी बातमी ! भायखळा तुरुंगात रवानगी होताच नवनीत राणा यांची प्रकृती खालावली

13BMNavneet Rana

मुंबई | आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा या राणा दाम्पत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानासमोर जाऊन हनुमान चालिसा पठण करणार असल्याची घोषणा केली होती. यानंतर शिवसेना जोरदार आक्रमक झाली.

हनुमान चालीसा पठन प्रकरणावरुन मुंबईत जोरदार राडा पहायला मिळाला. त्यांनंतर नवनीत राणा आणि रवी राणा तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. दोघांनाही वांद्रे न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

तुरूंगात रवानगी करण्याअगोदर आता त्यांचं मेडिकल चेकअप करण्यात येत आहे. त्यामुळे आता कोरोना चाचणीमुळे तुरुंगात न्यायला उशीर होणार आहे.

नवनीत राणा आणि रवी राणा यांना भायखळा कारागृहात ठेवण्यात आलं आहे. मात्र तुरुंगात रवानगी होण्याअगोदरच नवनीत राणा यांची प्रकृती खालावल्याचं समोर आलं आहे.

नवनीत राणा यांचं मेडिकल चेकअपमधे ब्लड प्रेशर वाढलेले आढळलं. सध्या त्या भायखला कारागृहाच्या रुग्णालयात दाखल असल्याची माहिती आहे.

नवनीत राणा यांच्या प्रकृतीमुळे सध्या टेंशन वाढलं आहे.  दुसरीकडे रवी राणा यांना घेऊन पोलीस मुंबईतील तळोजा कारागृहात पोहचले आहेत.

राणा दाम्पत्य प्रकरण आणि नंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या घरावरील हल्ला प्रकरणानंतर आता वातावरण चांगलंच तापल्याचं पहायला मिळत आहे.

राणा दाम्पत्यांमुळे शिवसैनिकांनी आक्रमक पवित्र घेतला आहे. राणा दाम्पत्यांच्या तुरुंगाबाहेरही शिवसैनिकांनी घोषणाबाजी करायला सुरुवात केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

  बाॅयफ्रेंडनं चोरला गर्लफ्रेंडचा मोबाईल; मग जे काही झालं ते तुम्हीच व्हि़डीओमध्ये बघा…

कॅप्टन कूल KL Rahul चा धमाका; मुंबई इंडियन्सविरूद्ध दमदार शतक ठोकलं

WHO च्या दाव्याने जगाचं टेन्शन वाढलं; लहान मुलांमध्ये आढळली ‘हिपॅटायटीस’ची प्रकरणे

फायर चंद्रभागा आजींची उद्धव ठाकरेंनी सहकुटूंब घेतली भेट; दिलं ‘हे’ खास गिफ्ट

बँकेची कामं आताच आटोपून घ्या! मे महिन्यात बँका तब्बल 13 दिवस बंद राहणार; पाहा तारखा