“मजूरांकडून रेल्वेभाडं घेणार नाही तर प्रत्येकी पाचशे रुपये मदत देणार”

पाटणा | लॉकडाऊनमुळे लाखो मजूर विविध भागात अडकून पडले होते. लॉकडाऊनमधून काहीशी सवलत दिल्यानंतर केंद्र सरकारने विविध राज्यात अडकून पडलेल्या मजुरांना त्यांच्या राज्यात परत जाण्याची परवानगी दिली आहे. तसेच या मजुरांसाठी श्रमिक स्पेशल गाड्या चालवण्यात येत आहेत.

श्रमिक स्पेशल गाड्यांमधून प्रवास करण्यासाठी केंद्र सरकारकडून भाडेवसुली करण्यात येत असल्याचं सांगितलं जात आहे. पण परराज्यातून येणाऱ्या मजुरांबाबत नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील बिहार सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

परराज्यातून श्रमिक स्पेशल गाड्यांमधून येणाऱ्या मजुरांकडून कुठल्याही प्रकारचे भाडे वसूल केले जाणार नाही, या मजुरांना सुरुवातीला क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात येईल. त्यानंतर या सर्व मजुरांना प्रत्येकी पाचशे रुपये मदत म्हणून दिले जातील, असं बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सांगितलंय.

दरम्यान, ही रक्कम बिहार सरकारकडून दिली जाणार असल्याची माहिती आहे. या योजनेंतर्गत बिहार सरकारने 19 लाख मजुरांना याआधीही प्रत्येकी एक हजार रुपये दिले असल्याची माहि

महत्वाच्या बातम्या-

-परदेशातील भारतीयांना विमानातून फुकट आणलं, मग स्थलांतरित कामगारांकडूनच पैसे का?- प्रकाश आंबेडकर

-रिंकू राजगुरुनं शेअर केला हॉट लूक; लाईक करायला उडाली चाहत्यांची झुंबड

-उद्धव ठाकरेंसह शिवसेनेकडून विधानपरिषदेचा दुसरा उमेदवारही निश्चित

-‘मजुरांना विनामूल्य रेल्वेसेवा द्या’; रितेश देशमुखनं शेअर केला मन सुन्न करणारा फोटो

-‘नैतिकतेच्या मुद्द्यावर तुम्ही इतिहासजमा झाला आहात’; आशिष शेलारांची शिवसेनेवर टीका