सुप्रिया ताई, सुनेचा छळ करणाऱ्या विद्या चव्हाणांविरोधात तुम्ही भूमिका घेणार की नाही?; भाजपचा सवाल

मुंबई| राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या सदस्या विद्या चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात सुनेचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर सुनेचे विवाहबाह्यसंबंध असल्याचा आरोप विद्या यांनी केला. यावर आता त्यांच्या सुनेने मुलगा होत नसल्याने आपला छळ करण्यात आल्याचा आरोप चव्हाण कुटुंबावर केला आहे. याच पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र भाजपने थेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनाच या प्रकरणात तुमची भूमिका काय असा सवाल केला आहे.

सुनेचा छळ केल्याप्रकरणी विद्या चव्हाण, त्यांचे पती अभिजित, मुलगा अजित, दुसरा मुलगा आनंद आणि त्यांची पत्नी शीतल यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी विलेपार्ले पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहे.

दिराने माझा लैंगिक छळ केल्याचा करत आपला मानसिक आणि शारीरिक छळ केला आहे. मला न्याय हवा आहे. यासाठी मी लढा देणार असल्याचं गौरी चव्हाण यांनी म्हटलं आहे.

या प्रकरणामध्ये विद्या यांच्या सुनेने केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर भाजपाने थेट विद्या चव्हाण यांच्या पक्षातील त्यांच्या सहकारी महिला नेत्यांना प्रश्न विचारला आहे. “खासदार सुप्रिया सुळे ताई आणि महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर ताई, सुनेचा छळ करणाऱ्या तुमच्या सहकारी विद्या चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबाच्या विरोधात तुम्ही भूमिका घेणार की नाही?,” असा सवाल भाजपाने राष्ट्रवादीच्या महिला नेत्यांना केला आहे. या ट्विटमध्ये सुळे आणि ठाकूर यांना टॅग करण्यात आलं आहे.

महत्वाच्या बातम्या- 

-CAA ला विरोध करणाऱ्या दोन भाजप नगराध्यक्षांची पक्षातून हकालपट्टी!

-“आरोग्य सुविधांवर अफाट खर्च होऊनही कुपोषणाने मुले दगावतात कशी?”

-ठाकरे सरकारने केली शेतकऱ्यांना दिलासा देणारी घोषणा; शंभर युनिटपर्यंत मिळणार मोफत वीज

-“राम भक्तांना धोका देणाऱ्या उद्धव ठाकरेंना अयोध्येत येऊ देणार नाही”

-… तर आम्ही शिवसेनेला पाठींबा देऊ- सुधीर मुनगंटीवार