…तर आम्ही आजही पुन्हा शिवेसेनेसोबत एकत्र यायला तयार आहोत- चंद्रकांत पाटील

मुंबई | राज्याच्या हितासाठी आम्ही आजही शिनसेनेसोबत एकत्र यायला तयार असल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. काल महाराष्ट्र भाजपची कार्यकारिणी बैठक पार पडली होती. बैठकीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी स्वबळावर निवडणूक लढा, अशा सूचना दिल्या होत्या. मात्र आज पाटलांनी शिवसेनेसोबत एकत्र येऊ असं म्हटलं आहे.

आम्ही शिवसेनेसोबत एकत्र आलो तरी आम्ही निवडणुका मात्र स्वबळावर लढणार असल्याचंही पाटलांनी सांगितलं आहे. यावेळी पाटलांनी शिवसेनेवर टीकाही केली.

शिवसेना सध्या खूप हवेत असून त्यांना स्वर्गाला बोटं टेकली असं वाटत आहे. शिवसेनेला उपरती झाली, तर येतील, आम्ही काही प्रयत्न करणार नाही. भाजपने हात पुढे केला असे काही अर्थ काढू नका, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, नितीश कुमारांनी जशी बिहारमध्ये वर्षभरानंतर लालूंची साथ सोडली. जर असंच काही शिवसेनेला वाटलं तर काँग्रेस-राष्ट्रवादीची साथ सोडून याबाबत चर्चा होऊ शकते पण ह्या सर्व जर तरच्या गोष्टी आहेत, असं पाटलांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

काय सांगता! ‘या’ कारणामुळे तुम्हाला आता भारतात पबजी खेळता येणार नाही!

काय सांगता?; सासूनंच लावून दिलं आपल्या सुनेचं दुसरं लग्न!

पुढील चार दिवस राज्यातील ‘या’ भागात जोरदार पावसाची शक्यता

घर सॅनिटाइझ करत होती महिला; अशा धक्कादायक प्रकारे ओढवला मृत्यू

महाविकास आघाडी सरकारचं स्टिअरिंग नक्की कुणाच्या हातात?