“ठाकरे सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांना विचारल्याशिवायच राष्ट्रवादी निर्णय घेते?”

मुंबई | मुस्लीम समाजाला शैक्षणिक संस्थांमध्ये 5 टक्के आरक्षण देण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी जाहीर केले होते. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत काही निर्णय झाला नसल्याचं म्हटलं आहे. यावरुन भाजपने शिवसेनेवर टीका केली आहे.

मुस्लिम आरक्षणाविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा युटर्न, चारदिवसांपूर्वीच सामनामधील आलेली बातमी आणि आजची बातमी. याचा अर्थ महाराष्ट्राच्या जनतेने असा घ्यायचा का राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री मुख्यमंत्र्यांना न विचारता निर्णय घोषीत करतात? नक्की हे सरकार चालवतय कोण?, असा सवाल करत भाजपने निशाणा साधला आहे.

मुख्यमंत्री यांनी जाहीर केलेली भूमिका आणि राष्ट्रवादीने केलेली घोषणा यामध्ये विसंगती असल्याने महाविकास आघाडीमध्ये सर्व काही आलबेल नाही असं दिसत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने आपल्या ट्वीटर हॅन्डलवरुन ठाकरे सरकारला लक्ष्य केले आहे.

दरम्यान, मुस्लीम आरक्षणाचा मुद्दा आमच्यासमोर आलेला नाही. जो मुद्दा आमच्यासमोर आलेला नाही त्यावरुन आदळआपट करण्याची गरज नाही, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं.

 

महत्वाच्या बातम्या-

-केवळ मला कळावा म्हणून ‘अर्थसंकल्प सोप्या भाषेत’ हे पुस्तक देवेंद्रजींनी लिहिलंय- उद्धव ठाकरे

-सोलापूरच्या खासदारावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश!; खासदारकी जाणार?

-बच्चू कडूंनी शेअर केला कर्जमाफ झालेल्या शेतकऱ्याचा ‘तो’ व्हिडीओ

-महाराष्ट्रातील 4 कलाकारांना राष्ट्रपतींच्या हस्ते ‘राष्ट्रीय ललित कला अकादमी पुरस्कार’ प्रदान

-रानू मंडलचे दिवस सरले… पुन्हा नशिबी आले ‘पुराने दिन’!