भाजपने या दोन नेत्यांची तिकीट कापली… तर या दोन नेत्यांना लागली लॉटरी!

मुंबई| भाजपकडून राज्यसभेसाठी माजी खासदार उदयनराजे भोसले तसंच रिपाईचे नेते रामदास आठवले यांना उमेदवारी जाहिर झाली आहे. तर दुसरीकडं भाजपनं दोन विद्यमान खासदारांना झटका दिला आहे.

भाजपनं संजय काकडे आणि अमर साबळे यांना डावललं आहे.  संजय काकडेंना राज्यसभेची उमेदवारी नक्की मिळणार अशी अपेक्षा होती परंतु आता त्यांचा आपेक्षा भंग झाला आहे तर दुसरीकडे अमर साबळेंना डावलल्यामुळं तेदेखील नाराज होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, तिसऱ्या जागेसाठी आम्ही एकनाथ खडसे यांच्या नावासाठी आग्रही आहोत, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील माध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत.

सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजेंचा धक्कादायकरित्या पराभव केला होता. तेव्हापासून उदयनराजे राजकारणातून जरा बाजूला पडले होते. मात्र आता राज्यसभेच्या रूपाने ते पुन्हा राजकारणात सक्रिय झालेले दिसून येणार आहेत.

महत्वाच्या बातम्या – 

-उदयनराजेंचं राजकीय भविष्य भाजपने ठरवलं; घेतला हा मोठा निर्णय…

-धक्कादायक! पुण्यात कोरोनाग्रस्त कुटुंबाला वाळीत टाकल्याचा प्रकार उघड

-मध्य प्रदेश प्रकरणाने उकळ्या फुटल्या तर पाकळ्या गळून पडतील – अमोल मिटकरी

-शरद पवार पुन्हा राज्यसभेच्या आखाड्यात… राज्यसभेसाठी अर्ज दाखल

-“कोरोना आला तर हजारोंनी मास्क घेतले… अपघाताने रोज 600 मरतात तरी हेल्मेट का घेत नाही”